Tarun Bharat

बेळगावच्या कन्यांची भारतीय फुटबॉल साखळी स्पर्धेला निवड

Advertisements

 क्रीडा प्रतिनिधी :

बेळगावनगरीच्या कन्या व फुटबॉलपटू अंजली अनिल हिंडलगेकर, आदिती प्रताप जाधव (लिंगराज महाविद्यालय बेळगाव), प्रियंका प्रशांत कंग्राळकर (एसडीएम महाविद्यालय मंगळूर) यांची अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने होणाऱया भारतीय महिला साखळी फुटबॉल स्पर्धेला बेंगळूर युनायटेड एफसी व किक स्टार्टस एफसी संघात निवड झाली आहे.

पहिल्यांदाच वरील तिन्ही फुटबॉलपटूंची व्यवसायीक फुटबॉलपटू म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे बेळगावचे नाव संपूर्ण देशभरात चर्चेला आले आहे. यामुळे यापुढील काळात बेळगावच्या महिला फुटबॉलपटूचे महत्त्व दिसून येणार आहे.

अंजली अनिल हिंडलगेकर, प्रियंका प्रशांत कंग्राळकर, अदिती प्रताप जाधव यांनी आपले फुटबॉल खेळाचे धडे मराठी विद्यानिकेतन स्कूलच्या संघातून घेतले. क्रीडा शिक्षक महेश हगिदळे यांनी या तीन फुटबॉलपटूंना मार्गदर्शन केले. दहावी पास झाल्यानंतर या तिन्ही फुटबॉलपटूंनी लिंगराज महाविद्यालय व
एसडीएम महाविद्याल मंगळूर येथे शिक्षण घेत आहेत. या तिन्ही फुटबॉलपटूंना माजी फुटबॉलपटू मतीन इनामदार यांचे कुशल मार्गदर्शन लाभत असून वरील फुटबॉलपटूंना बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक पंढरी परब, संघटनेचे आधारस्तंभ राम हदगल, सचिव अमित पाटील यांचे क्रिडा प्राध्यापक सी. रामराव यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभत आहे.

सदर स्पर्धा संपूर्ण भारतात दि. 24 जानेवारी ते  दि. 14 फेब्ा्रgवारीपर्यंत चालू राहणार आहे. 

 

Related Stories

तालुक्यात खरीप हंगामातील सुगीची धांदल

Amit Kulkarni

मराठीतूनच निवडणुकीची कागदपत्रे द्या

Patil_p

शहरात आज टाळ-मृदंगांचा गजर

Omkar B

रविवारी रन फॉर उत्सव मॅरेथॉनचे आयोजन

Amit Kulkarni

तालुक्यातील जमीन बळकावणाऱया बुडाला नोटीस

Patil_p

बेळगाव-सौंदत्ती मार्गावर विशेष बससेवा

Patil_p
error: Content is protected !!