Tarun Bharat

बेळगावच्या महिलांचे सौंदर्य स्पर्धेत यश

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

श्री की फॅशन क्रिएशनतर्फे घतलेल्या लाईन सौंदर्यवती स्पर्धेमध्ये बेळगावच्या रेखा शिरगावकर व जया जोशी यांनी विशेष कामगिरी करून उपांत्य फेरीत विविध गटात बक्षीस मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. रेखा यांनी बेस्ट प्लॅटिनम, बेस्ट नॅशनल कॉस्टय़ुम, बेस्ट क्रिएटीव्ह वूमन व बेस्ट इन्फ्युएशल इन सोशल मीडिया अशी बक्षिसे मिळविली आहेत. तर जया जोशी यांनी युनिटी क्वीन बेस्ट कॉन्फिडंट
ऍवॉर्ड हा किताब मिळविला.

 संस्थेने कोरोनामुळे ऑनलाईनद्वारे झूमवर ही स्पर्धा घेतली. त्यामध्ये रेखा सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेसाठी 32 ते 40, 40 ते 50 व 50 वरील असे महिलांचे तीन गट केले होते. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत महिलांनी आपली ओळख करून द्यावयाची होती. दुसऱया फेरीत भारतातील एका प्रांताचा पोषाख सादर करून त्याचे वैशिष्टय़ सांगावयाचे होते तर तिसऱया फेरीत इव्हनिंग गाऊन घालून घरातच रॅम्प वॉक करून त्याचा व्हिडिओ पाठवावयाचा होता. रेखा यांनी दुसऱया फेरीत बंगाली पद्धतीचा पोषाख करून त्याचे वैशिष्टय़ सांगितले. आयोजकांनी झूमवरच स्पर्धकांची मुलाखत घेतली व त्यांना विविध प्रश्न विचारले. उपांत्य फेरीत रेखा यांनी उत्कृष्ट पोषाख, निर्मिती क्षमता आणि समाज माध्यमावर लोकप्रिय अशी बक्षिसे मिळविली. तर जया जोशी यांनी युनिटी क्विन हा किताब मिळविला. उपांत्य फेरीतील यशामुळे त्यांची आता अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी श्री की फॅशनच्या उपाध्यक्षा अर्पिता देव व रुजीलीन डेव्हीड यांनी काम पाहिले.

Related Stories

स्मार्ट सिटीअंतर्गतच्या पहिल्या रस्त्याची अवस्था दयनीय

Patil_p

संभाजीनगर-वडगाव येथे घरफोडीत दागिने लंपास

Amit Kulkarni

जिल्हास्तरीय थ्रोबॉल स्पर्धेत गोमटेश संघ विजेता

Amit Kulkarni

खाते उघडण्यासाठी बेळगाव पोस्ट कार्यालयात तोबा गर्दी

Rohan_P

तानाजी गल्ली रेल्वेगेटजवळ सांडपाणी रस्त्यावर

Amit Kulkarni

पहिले रेल्वेगेट येथील बॅरिकेटस् हटविणार कधी?

Amit Kulkarni
error: Content is protected !!