Tarun Bharat

बेळगावमध्ये उतरले मॅक्स-8 विमान

विमानतळावर जल्लोषी स्वागत : बेळगाव-दिल्ली विमानफेरीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद 

प्रतिनिधी /बेळगाव

स्पाईसजेट या विमान कंपनीचे बी-737 मॅक्स-8 हे बोईंग विमान गुरुवारी बेळगाव विमानतळावर उतरले. पहिल्यांदाच मॅक्स-8 हे विमान विमानतळावर उतरले आहे. 189 आसन क्षमता असणाऱया या विमानाचे विमानतळावर जल्लोषी स्वागत करण्यात आले.

बेळगाव-दिल्ली या विमानफेरीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच आठवडय़ातून दोन दिवस सुरू झालेली ही विमानफेरी आता आठवडय़ातून चार दिवस सेवा देत आहे. राजधानी दिल्लीला थेट प्रवास करता येत असल्यामुळे प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आठवडय़ापूर्वी 180 प्रवासी बेळगावमध्ये दाखल होत होते. तर 185 च्या आसपास प्रवासी दिल्लीला रवाना होत होते.

गुरुवारी बेळगाव विमानतळावर स्पाईसजेट मॅक्स-8 हे बोईंग विमान उतरले. पहिल्यांदाच विमान दाखल झाल्याने संचालक राजेशकुमार मौर्य यांनी स्पाईसजेट कर्मचाऱयांचे स्वागत केले. तसेच केक कापून आनंद साजरा करण्यात आला. 20 डिसेंबरपासून सोमवार, मंगळवार, गुरुवार व शनिवार असे चार दिवस विमानसेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

प्रवाशांच्या संख्येत मात्र घट

डिसेंबरअखेरपर्यंत दिल्ली-बेळगाव-दिल्ली या विमानफेरीचे हाऊसफूल बुकिंग होत होते. परंतु जानेवारीपासून प्रवासी संख्या घटत चालली आहे. गुरुवारी 77 प्रवासी दिल्लीहून बेळगावला आले तर 76 प्रवासी बेळगावहून दिल्लीला गेले. मागील तीन ते चार फेऱयांची प्रवासी संख्या चिंताजनक ठरत आहे. दिल्ली येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळे प्रवासी संख्या घटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Related Stories

कॅन्टोन्मेंटमधील मालमत्तांचे ड्रोन कॅमेऱयाद्वारे सर्वेक्षण

Amit Kulkarni

स्वच्छता कामगारांना हक्काचे छत मिळणार कधी?

Patil_p

पोलीस स्थानकाजवळ उपनिरीक्षकावर हल्ल्याचा प्रयत्न

Amit Kulkarni

रिया खोत हिचा अमेरिकेत पुरस्कार देऊन गौरव

Patil_p

तुडये परिसरातील बसेस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय

Omkar B

कोरोनाग्रस्त आरोपीमुळे कॅम्प पोलीस स्थानकाला टाळे

Patil_p