Tarun Bharat

बेळगावमध्ये विमानप्रवास करणाऱयांच्या संख्येत वाढ

डिसेंबरमध्ये 34 हजार 201 प्रवाशांनी केला प्रवास

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱयांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. डिसेंबर 2020 मध्ये बेळगावमधून 34 हजार 201 प्रवाशांनी विमानप्रवास केला आहे. तर 727 विमानांच्या फेऱया झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. जानेवारी महिन्यात चेन्नई व नाशिक या विमानसेवा सुरू होत असल्याने जानेवारी महिन्यातील प्रवाशांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.

काही वर्षांपूर्वी बेळगावमधून एकाही विमानाचे उड्डाण होत नव्हते. परंतु सध्या दिवसाला विमानांच्या 28 फेऱया होत आहेत. 11 शहरांना थेट विमानसेवा सुरू आहे, तर येत्या काही दिवसात आणखी 2 शहरांना विमानसेवा सुरू करण्यात येत आहे. उडान- 3 मुळे सर्वसामान्यांना विमानप्रवास करणे शक्मय झाल्याने प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

 डिसेंबर 2019 मध्ये 32 हजार 571 प्रवाशांनी विमानप्रवास केला होता. तर 602 विमानांच्या फेऱया झाल्या होत्या. कोरोनाचे सावट असतानाही प्रवाशांच्या संख्येत मागील वषीपेक्षा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बेळगावमधून बेंगळूरला- 4, हैद्राबाद- 3, मुंबई- 2, पुणे, इंदूर, सुरत, कडाप्पा, तिरुपती, म्हैसूर, चेन्नई व अहमदाबाद या शहरांना 1 विमान सुरू आहे.

उत्तर कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्र या परिसरात सर्वात मोठे विमानतळ म्हणून बेळगावला मान मिळाला आहे. शेजारील कोल्हापूर व हुबळी या दोन्ही विमानतळांपेक्षा बेळगाव सरस ठरले आहे. कर्नाटकात बेंगळूर व मंगळूर या दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांनंतर बेळगावने स्थान पटकाविले आहे. एप्रिल ते डिसेंबर 20 मध्ये तब्बल 1 लाख 55 हजार प्रवाशांनी बेळगावमधून विमानप्रवास केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related Stories

बेळगुंदी येथे आत्मनिर्भर भारत योजनेचा शुभारंभ

Omkar B

किल्ला येथील उरूसाला उत्साहात प्रारंभ

Amit Kulkarni

मधुमेहावर वेळीच उपचार घेणे आवश्यक

Patil_p

पुलाच्या पश्चिमेला रक्षाविसर्जन करू नये

Amit Kulkarni

केदनूर लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी

Amit Kulkarni

पाणीपुरवठय़ात दोन दिवस व्यत्यय

Amit Kulkarni