Tarun Bharat

बेळगावसह चार जिल्हय़ांमधील सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल

Advertisements

सकाळी 8 ते दुपारी 1.30 पर्यंत होणार कामकाज

प्रतिनिधी / बेंगळूर

राज्यात एकीकडे कोरोनाचा कहर तर दुसरीकडे परिवहन कर्मचाऱयांचा संप सुरूच आहे. अशातच कडक उन्हामुळे तापमान वाढल्याने सोमवार दि. 12 एप्रिलपासून बेळगाव, विजापूर, बागलकोट आणि गुलबर्गा जिल्हय़ातील सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. याबाबत राज्य सरकारचे उपसचिव बी. एस. रविकुमार यांनी आदेश जारी केला आहे. 2021 सालातील एप्रिल आणि मे महिन्यात तापमान वाढणार असल्याने 4 जिल्हय़ांतील सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

बेळगाव, विजापूर, बागलकोट आणि गुलबर्गा या जिल्हय़ामध्ये सोमवार दि. 12 एप्रिलपासून मे महिन्यापर्यंत सरकारी कार्यालयातील कामाच्या वेळेत बदल केला आहे. त्यानुसार सकाळी 8 ते दुपारी 1.30 पर्यंत कामकाज करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Related Stories

सिंगीनकोप्प ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Amit Kulkarni

‘त्या’ निकालाची प्रत आम्हाला द्या

Amit Kulkarni

लिलाव प्रक्रियेनंतरही स्थगिती

Amit Kulkarni

कंग्राळी बुद्रुकमधील गटारींचे सीडी वर्क काम अर्धवट

Amit Kulkarni

अतिरिक्त शुल्क आकारल्यास कारवाई

Amit Kulkarni

बसथांबे कचरामुक्त कधी होणार?

Patil_p
error: Content is protected !!