Tarun Bharat

बेळगावसह राज्यातील तीन महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं

बेळगाव/प्रतिनिधी

बेळगावसह राज्यातील तीन महापालिकांची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने ११ ऑगस्ट रोजी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. महापालिकेसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान बेळगाव जिल्ह्याला अनेक दिवसापासून लागून राहिलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे.

निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी या निवडणुकीची अधिसूचना जारी करतील. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २३ ऑगस्ट आहे. २४ ऑगस्ट ही अर्ज पडताळणीची तारीख असणार आहे. तर अर्ज माघारी २६ ऑगस्ट रोजी घेता येणार आहेत. दरम्यान, पालिकेची ३ सप्टेंबर रोजी मतदान होणार असुन ६ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Related Stories

अधिकाऱ्यांच्या भरवश्यावर राज्य चालवणे चिंताजनक-सतेज पाटील

Rahul Gadkar

कर्नाटक : ‘कृषी संजीवनी’ मोबाइल टेस्टिंग लॅब वाहनांचे अनावरण

Archana Banage

अरबी समुद्रात न्यून दाबाचे क्षेत्र

datta jadhav

6 कोटीचे मोबाईल लांबविले

Amit Kulkarni

लाच घेताना मंडल अधिकाऱ्याचा पंटर अटकेत, अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Archana Banage

चिनी सैन्याची उत्तराखंडमध्ये घुसखोरी; पूल उध्वस्त

datta jadhav