Tarun Bharat

बेळगावातील 521 तपासणीच्या अहवालांची प्रतीक्षा

Advertisements

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये आरोग्य विभागाची तत्परता

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव जिल्हय़ातून प्रयोगशाळेला पाठविण्यात आलेले आणखी 521 स्वॅब तपासणी अहवाल प्रलंबित असून कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकाऱयांनी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलेल्या ठिकाणी आरोग्य विभागाने तत्परता दाखवत स्वॅब जमविण्याचा धडाका लावला आहे.

जिल्हा सर्वेक्षण विभागाने शुक्रवारी सायंकाळी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. जिल्हय़ातील 2697 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. 681 जणांना चौदा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. लॉकडाऊन काटेकोरपणे पाळले नाही तर परिस्थिती आणखी बिकट होण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसोलेशन विभागात 41 जणांवर उपचार करण्यात येत आहेत. जिल्हय़ातील 865 जणांनी चौदा दिवसांचे तर 1110 जणांनी 28 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण केले. आतापर्यंत एकूण 1396 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील 812 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 45 जणांचे पॉझिटिव्ह आले असून चौघे जण कोरोनामुक्त झाले आहे. त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे.

यापूर्वी बेंगळूर व शिमोग्याला स्वॅब पाठविण्यात येत होते. आता बेळगावातच स्वॅब तपासणी सुरू झाली आहे. त्यामुळे याकामी गती मिळणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली कोरोना नियंत्रणाचे काम हाती घेण्यात आले असून सरकारी यंत्रणा पूर्णपणे कामाला लागली आहे.

इंडोनेशियातील 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह

नवी दिल्ली येथील निजामुद्दिन मरकजमधील धार्मिक कार्यक्रमात भाग घेऊन बेळगावात आश्रय घेतलेल्या इंडोनेशियातील दहा जणांविरुद्ध येथील माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केले होते. त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या दहा जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे.

Related Stories

किरण ठाकुर यांची ‘माय एफएम’ रेडिओवर मुलाखत

Patil_p

कर्नाटकात ७ जुलैरोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन 

Archana Banage

महाद्वार रोडवरील खडी वाहनधारकांना धोकादायक

Amit Kulkarni

अंकोल्यात 2 कोटी 68 लाखाची ब्राऊनशुगर जप्त

tarunbharat

मंत्र आत्मनिर्भरतेचा, अर्थसंकल्प राज्याचा

Amit Kulkarni

गुंजीत अवजड वाहनांची वाहतूक रोखली

Amit Kulkarni
error: Content is protected !!