Tarun Bharat

बेळगावात अधिवेशन घेण्यासंबंधी राज्यपालांकडून अधिसूचना

Advertisements

13 डिसेंबरपासून सुवर्ण विधानसौधमध्ये विधिमंडळाचे कामकाज

प्रतिनिधी/ बेंगळूर

तीन वर्षानंतर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये घेण्यात येणार आहे. 13 डिसेंबरपासून अधिवेशन घेण्यासंबंधी शुक्रवारी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी अधिसूचना जारी केली आहे.

राज्यघटनेच्या 174 व्या अनुच्छेदानुसार असलेल्या अधिकाराचा वापर करून राज्यपालांनी बेळगावमधील सुवर्ण विधानसौधमध्ये 13 डिसेंबपासून विधिमंडळाचे अधिवेशन घेण्याची अधिसूचना जारी केली आहे. कोरोना व इतर कारणांमुळे मागील तीन वर्षांपासून बेळगावमध्ये अधिवेशन घेण्यात आले नव्हते. मात्र, उत्तर कर्नाटकातील आमदारांनी दबाव आणल्यामुळे मागील मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने बेळगावमध्ये अधिवेशन भरविण्याबाबत चर्चा केली होती. मात्र, तारीख स्पष्टपणे जाहीर केली नव्हती. आता 25 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱया मंत्रिमंडळ बैठकीत अधिवेशन किती दिवस भरवावे, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

विधिमंडळाचे अधिवेशन सुवर्ण विधानसौधमध्ये भरविण्याबाबत निर्णय घेण्यात आल्यानंतर काही दिवसांपूर्वीच विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी आणि राज्य पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱयांनी येथील व्यवस्थेची पाहणी केली होती. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण विधानसौधमध्ये पूर्वतयारी केली जात आहे.

Related Stories

इंडिया गेटवर नेताजींची होलोग्राम प्रतिमा

Patil_p

मुख्यमंत्र्यांनी बोलविली १८ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठक

Abhijeet Shinde

25 हजार ते 10 लाख

Patil_p

कठीण आव्हानांशी झुंजत 22 हजारांची सुटका

Patil_p

कोरोना युद्धात बेसावधपणा नकोच !

Patil_p

तिरूपती बालजी मंदिर उद्यापासून होणार खुले

Patil_p
error: Content is protected !!