Tarun Bharat

बेळगावात एका दिवसात 17 अहवाल पॉझिटिव्ह

Advertisements

बेळगाव/ बेळगाव :

रायबाग तालुक्मयापाठोपाठ आता संकेश्वर, ता. हुक्केरी येथेही कोरोनाचा रुग्ण आढळून आला असून गुरुवारी एका दिवसात 17 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये येळ्ळूर, ता. बेळगाव येथील एक महिला व संकेश्वर येथील एका रहिवाशाचाही समावेश आहे. हिरेबागेवाडी, कुडची येथील रुग्णसंख्या वाढतच चालली असून एकूण बाधितांची संख्या 36 वर पोहोचली आहे.

गुरुवारी दुपारी आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या अहवालात बेळगाव, रायबाग व हुक्केरी तालुक्मयातील 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये हिरेबागेवाडी येथील सहा महिलांसह आठ जणांचा समावेश आहे. संकेश्वर येथील एक रहिवासी, येळ्ळूर येथील एक महिला व कुडची येथील सात जणांचा यामध्ये सहभाग आहे.

स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या सर्व 17 जणांना सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण विभागात हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण विभागात सध्या एकूण 36 जणांवर उपचार करण्यात येत आहेत.

हेल्थ बुलेटिनमध्ये दिलेल्या माहितीनुसार हिरेबागेवाडी येथील 51 वषीय महिला, 42 वषीय युवक, 33 वषीय युवक, 16 वषीय तरुणी, 65 वषीय वृद्धा, 30 वषीय महिला, 54 वषीय महिला, 58 वषीय महिला असे एकूण आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर संकेश्वर येथील 47 वषीय रहिवासी, येळ्ळूर येथील 45 वषीय महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

कुडची, ता. रायबाग येथील 25 वषीय तरुण, 30 वषीय युवक, 43 वषीय युवक, 50 वषीय रहिवासी, 35 वषीय युवक, 25 वषीय तरुण व 64 वषीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून 50 वर्षांचा रहिवासी हा मूळचा गोव्याचा आहे. गेल्या महिन्यापासून तो कुडचीत रहात होता. तर 25 वषीय तरुण मूळचा मिरजचा असून सध्या रायबागला राहतो. रुग्ण क्रमांक 245 च्या संपर्कातून त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

तर हिरेबागेवाडी येथील आठ जणांना रुग्ण क्रमांक 224 व 225 क्रमांकांच्या रुग्णांच्या संपर्कातून कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी आलेल्या 17 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सात महिलांचा समावेश असून रुग्णांच्या संपर्कातून व निजामुद्दिन मरकजच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर यामधील बहुतेकांना कोरोनाची लागण झाली आहे.

आरोग्य विभागाने गुरुवारी दुपारी 34 जणांचा अहवाल जाहीर केला होता. तर सायंकाळी ही संख्या 36 वर पोहोचली होती. आणखी दोन रुग्णांची यात भर पडली होती. बेळगाव जिल्हय़ातील बेळगाव, रायबाग, हुक्केरी तालुक्मयातील एकूण 36 जणांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी हिरेबागेवाडी येथील 80 वषीय वृद्धेचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Related Stories

कर्नाटक: पत्नीची आठवण म्हणून घरी बसविला सिलिकॉनचा पुतळा

Abhijeet Shinde

माणुसकीने सोडली साथ… अन् प्रशासनाने दाखविला हात

Patil_p

बेळगावच्या गोल्डन स्क्वेअर अकादमीचे बुद्धिबळ स्पर्धेत यश

Amit Kulkarni

येळ्ळूर, राजहंसगड परिसराला पावसाने झोडपले

Patil_p

विजापुरात सात जण कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p

कोळसा पावडर वाहतूक करणाऱया ट्रकला आग

Patil_p
error: Content is protected !!