Tarun Bharat

बेळगावात तीन तर अथणी, गोकाकमध्ये तीन कोरोना पॉझिटिव्ह

Advertisements

तीन पोलिसांसह आठ जण झाले कोरोनामुक्त

प्रतिनिधी / बेळगाव

शनिवारी बेळगाव शहरातील तिघा जणांसह एकूण सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अथणी व गोकाकमध्ये तीन रुग्ण आढळून आले असून जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 465 वर पोहोचली आहे. तर तीन पोलिसांसह कोरोनामुक्त झालेल्या 8 जणांना घरी पाठविण्यात आले आहे.

शनिवारी बेळगाव शहरातील महांतेशनगर, आझमनगर व जक्कीनहोंडा परिसरातील तिघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्य हेल्थ बुलेटीनमध्ये याचा उल्लेख नाही. अथणी येथील एक वृध्द गोकाकमधील एका महिलेसह दोघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व सहा जणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

तर कोरोनामुक्त झालेल्या तीन पोलिस व शेडबाळ येथील एकाच कुटुंबातील पाच जणांसह एकूण आठ जणांना घरी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती बिम्स्चे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिरीश दंडगी यांनी दिली. सध्या सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात 115 हून अधिक जणांवर उपचार करण्यात येत आहेत.

जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2 हजार 280 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. सध्या आयसीएमआरमधील एका कर्मचाऱयाला कोरोनाची लागण झाल्यामुळे तेथीला तपासणी बंद आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात स्वॅब प्रलंबित आहेत. केवळ बिम्स्मधील लॅबमध्ये तपासणी सुरु आहे.

बेळगाव जिह्यातील प्रलंबित स्वॅबची संख्या वाढल्यामुळे काही प्रमाणात स्वॅब तपासणीसाठी बेंगळूरला पाठविण्यात आले आहे. त्यामुळे अहवाल येण्यास विलंब होत आहे. यामुळे साहजिकच मोठय़ा प्रमाणात स्वॅब तपासणीविना पडून आहेत. आयसीएमआरची प्रयोग शाळा पूर्णप्रमाणात सुरु झाल्यानंतर स्वॅब तपासणीला वेग येणार आहे.

बेळगाव शहर व उपनगरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी जागा अपुरी पडत आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी शनिवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देवुन तेथील पाहणी केली आहे.

Related Stories

नुकसानग्रस्त शेतकऱयांना आर्थिक मदत

Omkar B

ग्रामीण भागातील बहुतांशी जलशुद्धीकरण केंदे बंदच

Amit Kulkarni

अरगन तलाव परिसरातील रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य

Amit Kulkarni

जिल्हा पंचायत कार्यालयात विविध विकास कामे हाती घेणार

Patil_p

लॉकडाऊनमध्ये कुमारस्वामींच्या मुलाचे लग्न थाटात

prashant_c

मनपा गाळय़ांची सुनावणी शुक्रवारी

Amit Kulkarni
error: Content is protected !!