Tarun Bharat

बेळगावात मेगा लष्कर भरती

4 ते 15 फेब्रुवारीपर्यंत चालणार प्रक्रिया, जिल्हाधिकाऱयांकडून पूर्वतयारी बैठक

प्रतिनिधी / बेळगाव

विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या मैदानावर गुरुवार 4 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत लष्कर भरती होणार आहे. यासाठी बेळगावला येणाऱया उमेदवारांची आरोग्य तपासणी, सुरक्षा व इतर सुविधा पुरविण्यासंबंधी जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी अधिकाऱयांना सूचना केल्या.

शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ही बैठक झाली. सैन्यदलात भरती होण्यासाठी येणाऱया उमेदवारांना आवश्यक सुविधा मिळाव्यात. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या मैदानात व मैदानाबाहेर पोलीस व गृहरक्षक दलाने सुरक्षा पुरवावी. आरोग्य खात्याने उमेदवारांची थर्मल
स्कॅनिंगद्वारे तपासणी करण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली आहे.

याबरोबरच आरोग्य विभागाने मास्क, सॅनिटायझर व रुग्णवाहिका तयार ठेवावी. भरती प्रक्रियेवेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी या परिसरात हजर राहणे सक्तीचे आहे. मध्यवर्ती बसस्थानक व रेल्वेस्थानकापासून विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या मैदानावर उमेदवारांना जाता यावे, यासाठी आवश्यक बस सुविधा पुरविण्याची सूचना परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांना करण्यात आली आहे.

अधिकाऱयांना सूचना

लष्कर भरतीसाठी रोज 5 हजार उमेदवार भाग घेणार आहेत. 4 ते 15 फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. एका फेरीत 250 उमेदवार भाग घेतील, अशी सोय आहे. शिक्षण खात्याच्या अधिकाऱयांनी उमेदवारांचे दाखले तपासावेत, अशी सूचना करण्याबरोबरच परिसरात अखंडित वीजपुरवठय़ासंबंधी आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना हेस्कॉमच्या अधिकाऱयांना करण्यात आली आहे.

Related Stories

मनपा निवडणुका होणारच!

Omkar B

दोन महिन्यांनंतर दिवसभर शहर गजबजले

Amit Kulkarni

कोंबडी बाजार भंगीबोळातील पार्किंगमुळे व्यावसायिक त्रस्त

Amit Kulkarni

दूधसागर धबधबा अधिकृतरीत्या खुला करण्याची मागणी

Amit Kulkarni

टिप्परने घेतला शाळकरी मुलाचा बळी

Patil_p

टेझर हंट स्पर्धा ठरली रोमांचक

Amit Kulkarni