Tarun Bharat

बेळगावात 29 मे रोजी होणार ‘खाण अदालत’

राज्यातील पाच ठिकाणी आयोजन

प्रतिनिधी / बेंगळूर

खाण व्यावसायिक आणि कामगारांच्या समस्या दूर करण्यासाठी राज्यात पाच ठिकाणी ‘खाण अदालत’ घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री मुरुगेश निराणी यांनी दिली. रविवारी गुलबर्गा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 30 एप्रिल रोजी बेंगळूरातील राजवाडा मैदान, 15 मे रोजी म्हैसूर, 29 मे रोजी बेळगाव, 11 जून रोजी गुलबर्गा आणि 25 जूनला मंगळूर येथे या अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

मंत्री निराणी पुढे म्हणाले, कर्मचारी आणि व्यावसायिकांना या अदालतसाठी अर्ज करण्याची परवानगी दिली आहे. खाणीला परवानगी देण्यासाठी व्यावसायिकांची भटकंती होत असते. त्यामुळे यावर पर्याय म्हणून पुढील महिन्यापासून एकाच ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे. शिमोगा आणि चिक्कबळ्ळापूरमध्ये जिलेटीन कांडय़ांचा स्फोट होऊन काही जणांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर स्फोटकांचा उपयोग, वाहतूक आणि संग्रहाबाबत खाण व्यावसायिक आणि कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येत आहे. डायरेक्टर जनरल ऑफ मायनिंग सेक्युरिटी (डीजीएमएस) च्या परवानगी शिवाय राज्यात 2500 ठिकाणी खाण काम सुरू आहेत. या सर्वांना डीजीएमएसकडून परवानगी घेऊन खाण काम सुरू करण्यासाठी नोटीस जारी केल्या आहेत.

प्रत्येक जिल्हय़ात खनिज भवन

राज्यात गेल्या पाच-सहा वर्षांत 2400 कोटी रुपयांचा डीएमएफ निधी जमा झाला आहे. यापैकी केवळ 800 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. पुढील तीन महिन्यात उर्वरित रक्कमेतून खाण प्रदेशाच्या विकासासाठी वापर करण्याची सूचना डीएमएफ समितीला दिली आहे. प्रशासन सुधारण्यासाठी प्रत्येक जिल्हय़ात दोन कोटी रुपये खर्चातून खनिज भवन निर्माण केले जाईल, असेही मंत्री निराणी म्हणाले.

Related Stories

बेंगळूर: शशिकला यांचा माफीसाठी अर्ज

Archana Banage

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष शिवकुमार २२ रोजी होसापेट दौऱ्यावर

Archana Banage

delta plus variant : कर्नाटकच्या सीमेवर पाळत ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

Archana Banage

कृषी कायद्यांविरोधात ‘बंद’ला अल्प प्रतिसाद

Amit Kulkarni

कर्नाटकात सक्रिय रुग्णसंख्येत घट कायम

Archana Banage

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच

Amit Kulkarni