Tarun Bharat

बेळगाव-कोल्हापूर बसप्रवास महागला

Advertisements

वार्ताहर/ तुडये

केएसआरटीसीने बेळगाव-कोल्हापूर दरम्यानच्या प्रवासाला 12 रुपये दरवाढ केली असल्याने बेळगाव-कोल्हापूरचा कर्नाटकमधील प्रवास महागला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने मात्र जुनाच दर कायम ठेवल्याने प्रवाशांना फायद्याचे ठरत आहे. तर कर्नाटक परिवहन मंडळाने मात्र प्रवाशांची लूट चालविली आहे.

मार्च महिन्यातील लॉकडाऊननंतर बेळगाव-कोल्हापूर बस वाहतूक बंद होती. 22 सप्टेंबरपासून ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. बससेवा पूर्ववत जरी सुरू झाली तरीही प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद अजूनही दिसत नाही. मोजक्याच प्रवाशांसह बस वाहतूक सुरू आहे. बेळगाव-कोल्हापूर दरम्यानच्या प्रवासासाठी कर्नाटक बसेसना 133 रुपये तिकीट दर आहे तर याच प्रवासासाठी महाराष्ट्र बसेसना 120 रुपये तिकीट आहे. लॉकडाऊनपूर्वी कर्नाटक बसला 121 रुपये तर महाराष्ट्र बसना 120 रुपये तिकीट होते. कर्नाटक बसने प्रवास करणे आता 13 रुपये महाग पडत आहे. बेळगाव बसस्थानक प्रमुखांनी याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून प्रवाशांची होणारी लूट थांबवावी, अशी मागणी प्रवाशांतून करण्यात आली आहे.

Related Stories

…अन्यथा सेवा स्थगित करू

Amit Kulkarni

संगीता बांदेकर-कुलकर्णी यांच्या संमिश्र गायनाचा आज कार्यक्रम

Amit Kulkarni

समर्थनगर येथील पारायण सांगता

Amit Kulkarni

गाळय़ांच्या लिलावास थंडा प्रतिसाद

Amit Kulkarni

विनामास्क फिरणाऱयांकडून आकारल्या जाणाऱया दंडात कपात

Omkar B

खानापुरात विविध संघटनांतर्फे शिवजयंती साजरी

Amit Kulkarni
error: Content is protected !!