Tarun Bharat

बेळगाव-चोर्ला महामार्ग फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्णत्वाला गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांची माहिती : तरुण भारताला दिली सदिच्छा भेट

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव-चोर्ला रस्त्याची दुरुस्ती आम्ही लवकरच हाती घेणार असून फेब्रुवारी अखेरपर्यंत हॉटमिक्स पद्धतीने रस्ता पूर्ण करण्यात येणार आहे. कंत्राटदाराला तशी सूचना देण्यात आली आहे. हा रस्ता किमान 5 वर्षे टिकेल याची जबाबदारी कंत्राटदाराकडे देण्यात आली आहे. तसेच गोवा हद्दीतील गोवा रस्त्याचे काम फेब्रवारी अखेरपर्यंत आम्ही पूर्ण करणार आहोत. त्यामुळे बेळगाव-गोवा प्रवास आरामदायी होईल, असा विश्वास गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी व्यक्त केला.

शनिवारी सायंकाळी मंत्री पाऊसकर यांनी तरुण भारतच्या बेळगाव मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री यांनी त्यांचे स्वागत केले. तरुण भारतचे साहाय्यक संपादक विजय पाटील यांनी गोव्यातील कार्याविषयी माहिती विषद केली. यावेळी गोव्यातील विकासासंबंधी चर्चा झाली. यावेळी त्यांनी बेळगाव व गोवा या दोन राज्यांना जोडणाऱया चोर्ला व अनमोड या रस्त्यासंबंधी आपण स्वतः जातीने लक्ष देत आहे, फेब्रुवारी अखेरपर्यंत काम पूर्ण करण्यात येईल, अशी हमी त्यांनी दिली.

यावेळी त्यांच्यासोबत गोव्यातील प्रसिद्ध नाटय़कर्मी आप्पा गावकर, गोविंद गावकर, माधवराव देसाई, भोला गावकर, संतोष गावकर, सर्वेशानंद देसाई, देविदास नाईक, सामाजिक कार्यकर्ते रवी साळुंखे, वल्लभ गुणाजी, तरुण भारतचे बेळगाव आवृत्ती प्रमुख सुनील शिंदे, प्रतिनिधी रमेश हिरेमठ, छायाचित्रकार जगदीश दड्डीकर, दीपक बुवा, सुशांत कुरंगी, सुनील राजगोळकर आदी उपस्थित होते.

रंगकर्मी आप्पा गावकर यांनी जागविल्या नाटय़क्षेत्रातील आठवणी

गोव्यातील मोले गावचे प्रसिद्ध रंगकर्मी आप्पा गावकर यांनी आपल्या नाटय़ क्षेत्रातील कारकिर्दीविषयी आपले अनुभव कथन केले. आपले घर हे रंगभूमी असून घरातील सर्व कुटुंबीय हे माझ्या कलेशी जोडलेले आहेत. करवीर सौदामिनी या नाटकाचे प्रयोग गोव्यासोबतच महाराष्ट्रातही झाले. त्याला महाराष्ट्र सरकारचा नाटय़ लेखनाचा पुरस्कार आपल्याला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अगदी लहानपणापासून नाटय़क्षेत्रात असून तरुण भारतने माझ्या नाटय़क्षेत्रातील कार्याला वेळोवेळी प्रसिद्धीसह प्रोत्साहन दिले, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

उत्तर प्रदेशच्या तोतया मंत्र्यांच्या अटकेने खोलवासियांनाही धक्का

Patil_p

वजन आणि माप खात्याची मोठी कारवाई

Amit Kulkarni

केरळ ब्लास्टर्सला नमवित नॉर्थईस्ट युनायटेड प्ले-ऑफमध्ये दाखल

Amit Kulkarni

उसळणाऱया गर्दीमुळे कोरोनाच्या प्रसाराची भीती

Patil_p

काल कोरोनाचा एकही बळी नाही, 75 नवे बाधित

Omkar B

मडगावात उद्या स्केच प्रदर्शन

Amit Kulkarni