Tarun Bharat

बेळगाव जिल्हयातील आणखी १७ जणांना कोरोनाची लागण

एकूण रुग्णांची संख्या 36 वर

प्रतिनिधी/बेळगाव

बेळगाव जिल्हयातील आणखी १७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये हिरेबागेवाडी व कुडची येथील ७ महिलांची समावेश असून चिक्कोडी व बेळगाव शहरातील २ जणांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे एकुण रुग्णांची संख्या ३६ वर पोहचली आहे.

आरोग्य विभागाने गुरुवारी दुपारी जारी केलेल्या हेल्थ बुलेटिन मध्ये ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. गुरुवारी एका दिवसात संपुर्ण राज्यात ३४ जणांचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये बेळगाव जिल्हयातील १७ जणांचा समावेश आहे.

हिरेबागेवाडी येथील ६ महिला व २ पुरुष, चिक्कोडी येथील १ युवक, बेळगाव येथील १ महिला व कुडची ता. रायबाग येथील ७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून याच यादीत गोवा व मिरज येथील दोघाजणांचा समावेश आहे. सध्या ते रायबाग तालुक्यात राहत होते. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Related Stories

मराठा समाजाला आर्थिक दुर्बलांचे लाभ; ठाकरे सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

Archana Banage

सांगरुळच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत सातारचा फैय्याज शेख “छत्रपती श्री” चा मानकरी

Abhijeet Khandekar

रमजान मुबारक! मोदींकडून देशवासियांना शुभेच्छा

prashant_c

भाजपच्या गुंडांकडून केजरीवालांच्या घरावर हल्ला

datta jadhav

उद्धव ठाकरेंचं बंडखोर आमदारांना आवाहन! म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही…

Abhijeet Khandekar

लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवणार

datta jadhav