Tarun Bharat

बेळगाव जिल्हा पालकमंत्रिपदी कारजोळ

जोल्लेंना विजयनगर तर कत्तींना विजापूरची जबाबदारी

प्रतिनिधी /बेंगळूर

राज्यात मंत्रिमंडळ विस्तारासाठी आमदारांनी दबाव आणलेला असतानाच  मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सोमवारी जिल्हा पालकमंत्र्यांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यानुसार बेळगाव जिल्हा पालकमंत्रिपदी पाटबंधारेमंत्री गोविंद कारजोळ यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मंत्री शशिकला जोल्ले यांना नव्याने स्थापन करण्यात आलेल्या विजयनगर जिल्हय़ाची तर उमेश कत्ती यांच्यावर विजापूर जिल्हय़ाची जबाबदारी देण्यात आली आहे. कारवार जिल्हा पालकमंत्रिपदी धर्मादाय खात्याचे मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांनी नेमणूक करण्यात आली आहे.

बोम्माई यांनी 28 जुलै 2021 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सप्टेंबरमध्ये त्यांनी कोरोना नियंत्रणासाठी मंत्र्यांना जिल्हावार जबाबदारी सोपविली होती. त्याच मंत्र्यांवर जिल्हय़ांचा भार सोपविण्यात आला होता. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी मागील आदेश रद्द करून नव्या आदेशानुसार जिल्हा पालकमंत्र्यांची नेमणूक केली आहे. याच मंत्र्यांना त्या जिल्हय़ांमधील कोरोना नियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे. पालकमंत्री नेमणुकीत बोम्माईंनी बदल केले असून येडियुराप्पा यांच्या काळात आपापल्या जिल्हय़ांची जबाबदारी मिळविलेल्या अनेक मंत्र्यांना दुसऱया जिल्हय़ांची जबाबदारी दिली आहे.

कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांना हावेरी तर सी. सी. पाटील यांना बागलकोट आणि हालप्पा आचार यांना धारवाड जिल्हा पालकमंत्रिपदी नेमण्यात आले आहे.

दरम्यान, महसूलमंत्री आर. अशोक, जे. सी. माधुस्वामी यांना कोणत्याही जिल्हय़ाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. आर. अशोक यांनी बेंगळूर शहर जिल्हय़ाचे पालकमंत्रिपद मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. मुख्यमंत्र्यांनी स्वतःजवळच बेंगळूर शहर जिल्हय़ाचे पालकमंत्रिपद ठेवून घेतले आहे. मंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी तुमकूर जिल्हय़ाचे पालकमंत्रिपद मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. मात्र, त्यांना कोणत्याच जिल्हय़ाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. चित्रदुर्ग जिल्हय़ातील मोळकाल्मूरचे आमदार असणारे मंत्री बी. श्रीरामुलू यांनी बळ्ळारी जिल्हय़ाचेच पालकमंत्रिपद द्यावे असा अट्टाहास धरला होता. त्यात ते यशस्वी ठरले आहेत. सहकारमंत्री एस. टी. सोमशेखर यांनी पुन्हा आपल्याच म्हणजे म्हैसूर जिल्हय़ाची जबाबदारी मिळविली आहे.

पालकमंत्री आणि जिल्हा

  • बसवराज बोम्माई………….. बेंगळूर शहर
  • गोविंद कारजोळ …………… बेळगाव
  • के. एस. ईश्वरप्पा ………….. चिक्कमंगळूर
  • बी. श्रीरामुलू ……………….. बळ्ळारी
  • उमेश कत्ती ………………….. विजापूर
  • व्ही. सोमण्णा ………………. चामराजनगर
  • एस. अंगार …………………. उडुपी
  • अरग ज्ञानेंद्र ………………… तुमकूर
  • सी. एन. अश्वथ नारायण …. रामनगर
  • सी. सी. पाटील …………….. बागलकोट
  • आनंद सिंग …………………. कोप्पळ
  • कोटा श्रीनिवास पुजारी……. कारवार
  • प्रभू चौहान………………….. यादगीर
  • मुरुगेश निराणी ……………. गुलबर्गा
  • शिवराम हेब्बार…………….. हावेरी
  • एस. टी. सोमशेखर ………… म्हैसूर
  • बी. सी. पाटील …………….. चित्रदुर्ग आणि गदग
  • बी. ए. बसवराज……………. दावणगेरे
  • डॉ. के. सुधाकर…………….. बेंगळूर ग्रामीण
  • के. गोपालय्या ……………… हासन आणि मंडय़ा
  • शशिकला जोल्ले ……………. विजयनगर
  • एमटीबी नागराजू…………… चिक्कबळ्ळापूर
  • के. सी. नारायणगौडा …….. शिमोगा
  • बी. सी. नागेश …………….. कोडगू
  • व्ही. सुनीलकुमार ………….. मंगळूर
  • हालप्पा आचार……………… धारवाड
  • शंकर पाटील मुनेनकोप्प …… रायचूर आणि बिदर
  • मुनिरत्न ……………………… कोलार

Related Stories

वेणुग्राम सायकल क्लबच्या 11 सायकलपटूंनी रचला नवा विक्रम

Amit Kulkarni

कर्ले येथे गोवा बनावटीची 108 लिटर दारू जप्त

Amit Kulkarni

खंजर गल्ली येथे मटका अड्डय़ावर छापा

Patil_p

पत्रकार-कुटुंबीयांसाठी विविध योजना राबविणार

Amit Kulkarni

मतदारराजा जागा हो… सावध हो!

Amit Kulkarni

पाणीपुरवठा मंडळातील हंगामी कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार

Patil_p