Tarun Bharat

बेळगाव जिल्हा मुलींचा खो-खो संघ बेंगळूरला रवाना

Advertisements

प्रतिनिधी / येळ्ळूर :

कर्नाटक मिनी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन बेंगळूर येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी बेळगाव जिल्हा मुलींचा खो-खो संघ बेंगळूरला रवाना झाला आहे. या खो-खो संघासाठी येळ्ळूर येथे चार दिवसांचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

नवहिंद क्रीडाकेंद्र येळ्ळूरच्या सहा मुलींचा या संघात सहभाग आहे. रसिका कंग्राळकर, प्रणाली बिजगरकर, सानिका गोरल, योगिता नंद्याळकर, संजना चिट्टी आणि रोहिणी गोरल या सहभागी आहेत. तर बेळगाव शहराच्या सानिया मुल्ला, खानापूर तालुक्मयातील गौरी मेलगे, कडोली क्रीडा केंद्राची श्रेया उच्चुकर, भूमिका अतिवाडकर, रामदुर्ग तालुक्मयातील लक्ष्मी हिरेमठ, अपुर्वा हिरेमठ याचा समावेश आहे.

या संघाला वाय. सच. गोरल, एस. व्ही. मायकोजी, पांडुरंग निलजकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या सर्व खेळाडूंची निवड बेळगाव जिल्हा अमॅच्युअर खो-खो संघटनेने केली आहे. सदर संघाला सन्मित्र सोसायटीने खेळण्यासाठी गणवेश देवून शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Stories

धारवाडने 25 वर्षानंतर एसए श्रीनिवासन चषक जिंकला

Amit Kulkarni

असा आहे आपला वॉर्ड

Patil_p

जिवाचा जीवलग भेटवा!

Amit Kulkarni

रिंगरोडच्या विरोधातील मोर्चात खानापूर म.ए.समितीचे कार्यकर्ते सहभागी

Amit Kulkarni

स्मार्ट सिटीच्या अर्धवट विकासकामांचा व्यावसायिकांना फटका

Patil_p

मनपाच्या व्यापारी गाळे लिलाव प्रक्रियेला चांगला प्रतिसाद

Patil_p
error: Content is protected !!