Tarun Bharat

बेळगाव जिल्हय़ाच्या प्रत्येक तालुक्यात होणार कोविड रूग्णालय

सिव्हिल हॉस्पिटलवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय : महिला आणि बालकल्याणखात्याच्या मंत्री शशिकला ज्वोल्ले यांची पत्रकार परिषदेत माहिती

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलवर ताण पडत आहे. हा ताण कमी करण्यासाठी प्रत्येक तालुक्मयामध्ये कोविड-19 हॉस्पिटल सुरु करणार आहे. सरकारी इमारती तसेच सरकारी इस्पितळांमध्ये हा विभाग सुरु करणार असून खासगी डॉक्टर देखील रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा होणार आहे, असे महिला आणि बालकल्याणखात्याच्या मंत्री शशिकला ज्वोल्ले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मणगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाबाबत त्या म्हणाल्या, ग्राम पंचायतीची परवानगी घेवून योग्य प्रकारे पुन्हा पुतळय़ाची उभारणी केली जाईल. गाव पातळीवरच चर्चा करुन हा प्रश्न निकालात काढण्यात आला आहे. मात्र बाहेरील व्यक्ती येवून हा मुद्दा चिघळण्याचा प्रयत्न करत आहेत. ते चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.

कोल्हापूरमध्ये जाऊन महापूराबाबत चर्चा केली आहे. पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनीही महाराष्ट्रातील मंत्र्यांशी संपर्क साधून महापूराची काळजी घेतली आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व ती तयारी केली असून आम्ही महाराष्ट्राच्या अधिकाऱयांशी आणि मंत्र्यांशी सतत संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार आण्णासाहेब ज्वोल्ले, रायबागचे आमदार आनंद मामनी हे उपस्थित होते.

Related Stories

ध्वज-बॅनरबाजीची मनपाला डोकेदुखी

Amit Kulkarni

ओला दुष्काळ जाहीर करा; योग्य नुकसानभरपाई द्या

Amit Kulkarni

आठ दिवस उलटले तरी परिस्थिती जैसे थे

Amit Kulkarni

परिवहनला लागले उत्पन्न वाढीचे वेध

Amit Kulkarni

महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवावा!

Amit Kulkarni

बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याची चाळण; प्रशासनाचे दुर्लक्ष

Amit Kulkarni