Tarun Bharat

बेळगाव जिल्हय़ातील नऊ तालुके होणार खुले

पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी दिला आदेश

प्रतिनिधी / बेळगाव

जिल्हय़ातील ज्या तालुक्मयामध्ये कोरोनाग्रस्त रूग्ण आढळले नाहीत ते नऊ तालुके दि. 4 मे नंतर सर्वांसाठी खुले करा, असा आदेश पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी दिले आहेत. गेल्या दीड महिन्यापासून शहरासह संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन होता. त्यामुळे जनतेला घरातच थांबावे लागत आहे. मात्र आता पालकमंत्र्यांनी तालुके खुले करण्याचे आदेश दिल्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

जिल्हय़ातील बेळगाव, रायबाग आणि हुक्केरी या तालुक्मयांमध्ये कोरोनाग्रस्त रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे या तिन्हीं तालुक्मयाला रेड झोनमध्ये अजुनही टाकण्यात आले आहेत. मात्र इतर नऊ तालुक्मयामध्ये एकही रूग्ण आढळला नाही त्यामुळे त्या तालुक्मयांतील अंर्तगत व्यवहार सुरळीत करावे, असे त्यांनी सांगितले आहे.

पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी हा आदेश दिल्यामुळे 4 मे नंतर तालुक्मयातील व्यवहार सुरळीत होणार आहेत. बेळगाव, रायबाग आणि हुक्केरी या तालुक्मयामध्ये एकूण 73 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे या तालुक्मयांतील व्यवहारांवर निर्बंध राहणार आहेत. असेही जगदीश शेट्टर यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

निवडणूक अधिकाऱयाकडेच आढळले रिव्हॉल्वर

Patil_p

दूधसागरनजीक दरड कोसळली

Amit Kulkarni

रस्त्यावरच दुकाने थाटल्याने नंदगड बाजारपेठेत गर्दी

Amit Kulkarni

परतीच्या पावसाने उडविली दाणादाण

Amit Kulkarni

पवन धनंजय, श्रीयन, दक्षण एस., मीनाक्षी मेनन विजेते

Amit Kulkarni

‘लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी’ लोकसेवेसाठी रुजू

Patil_p