Tarun Bharat

बेळगाव जिल्हय़ात कोरोना बाधितांची शंभरी पार

निजामुद्दिन मरकजनंतर आता अजमेर कनेक्शन, रविवारी आणखी 22 जणांना लागण झाल्याचे उघड, बाधितांची संख्या 107 वर, राज्यात बेळगाव आता दुसऱया क्रमांकावर, बागलकोटमधील 8 जणांचाही सहभाग

प्रतिनिधी बेळगाव

बेळगाव जिल्हय़ात कोरोनाने शंभरी पार केली आहे. रविवारी जिल्हय़ातील आणखी 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली आहे. अहवाल पॉझिटिव्ह आलेले हे राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला गेले होते. तेथून परतल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता निजामुद्दिन मरकजपाठोपाठ अजमेर कनेक्शनमुळे कोरोनाचा फैलाव वाढत चालल्याचे सामोरे आले आहे. अजमेरहून खासगी बसमधून बेळगावला आलेल्या या 38 पैकी 30 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 22 जण बेळगाव जिल्हय़ातील तर 8 जण बागलकोट जिल्हय़ातील आहेत.

रविवारी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये संपूर्ण राज्यात 54 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये बेळगाव जिल्हय़ातील 22 व बागलकोट जिल्हय़ातील 8 असे अजमेरहून परतलेल्या 30 जणांचा समावेश असून या 30 जणांना सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात हलविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी दिली आहे.

प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. त्यामुळे कोगनोळी तपासनाक्मयावरील पोलीस, महसूल कर्मचाऱयांचे अभिनंदन केले जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी व जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या खबरदारीमुळे अजमेर कनेक्शनमुळे होणारा फैलाव वेळीच रोखला गेला आहे.

बेळगाव जिल्हय़ात कोरोना बाधितांची संख्या 107 पोहोचली असून बेंगळूर पाठोपाठ राज्यात बेळगाव दुसऱया क्रमांकावर आले आहे. 88 रुग्णसंख्या असलेले म्हैसूर आतापर्यंत दुसऱया क्रमांकावर होते. रविवारी बेळगाव जिल्हय़ात आणखी 22 बाधितांची भर पडल्यामुळे एका दिवसात बेळगाव जिल्हय़ाने दुसऱया क्रमांक गाठला आहे.

Related Stories

अनुभवाचे शिक्षण हे पुस्तकी ज्ञानापेक्षा श्रेष्ठ!

Omkar B

महसूलवाढीसाठी बुडा कार्यालयात गाळय़ांची उभारणी

Omkar B

भीषण अपघातात डॉक्टर पत्नीसह मुलगी ठार

Amit Kulkarni

सार्वजनिक गणेशोत्सव मंडपासाठी परवानगी

Amit Kulkarni

बनावट यादी बनवून पूरग्रस्तांची फसवणूक

Patil_p

के.एल.ई डॉ.प्रभाकर कोरे हॉस्पिटल मध्ये यशस्वी लिव्हर प्रत्यारोपण

mithun mane