Tarun Bharat

बेळगाव जिल्हय़ात मंगळवारी 278 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

कोरोनामुळे मंगळवारी 14 जण दगावले, 28 जण कोरोनामुक्त

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोना बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मंगळवारीही कोरोनामुळे 14 जण दगावल्याचे पुढे आले आहे. तसेच 278 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 28 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे.

मंगळवारी बेळगाव तालुक्मयामध्ये 131, यामध्ये शहरातील 91 जणांचा तर ग्रामीण भागातील 40 रुग्णांची वाढ झाली आहे. तर इतर तालुक्मयांमध्ये 147 जणांना कोरोनाची बाधा झाली असून जिह्यात 278 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दररोज कोरोनाची आकडेवारी वाढत चालली आहे. त्यामुळे बिम्स्वर तणाव वाढत चालला आहे.

मंगळवारी शहरातील समादेवी गल्ली तसेच इतर भागांमध्ये रुग्ण आढळले आहेत. समादेवी गल्लीतील पंतवाडा सीलडाऊन करण्यात आला आहे. याचबरोबर वडगाव, शहापूर परिसरातही रुग्णांची संख्या वाढल्यामुळे अनेक गल्ल्यां सीलडाऊन करण्यात आल्या असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. आता जनतेने याबाबत गांभीर्य घेणे गरजेचे आहे.

आतापर्यंत आरोग्य विभागाने 99 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. मात्र प्रत्यक्षात ही आकडेवारी अधिक असल्याचे समजते. जिह्यामध्ये सध्या 2 हजार 801 जणांवर उपचार सुरु आहेत. बिम्स् बरोबरच खासगी इस्पितळातही उपचार सुरु आहेत. याचबरोबर आरोग्य विभागाने संशयित रुग्णोंवरही लक्ष ठेंवले आहे.

Related Stories

तालुक्मयात अजूनही 17 कोटीची घर-पाणीपट्टी शिल्लक

Omkar B

पारगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

Patil_p

टिळकवाडी पोलिसांनी केली कोरोनाबाबत जनजागृती

Patil_p

हिंदवाडी महिला मंडळातर्फे कोरोना योद्धय़ांचा सत्कार

Amit Kulkarni

निपाणीत उरुसास अत्यल्प गर्दी

Patil_p

कडक लॉकडाऊननंतर पुन्हा खरेदीसाठी गर्दी

Amit Kulkarni