Tarun Bharat

बेळगाव जिल्हय़ात शनिवारी 32 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

24 जण झाले बरे : युवकाचा मृत्यू

 प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव शहर व जिह्यात कोरोना रुग्ण संख्येत घट होत चालली आहे. शनिवारी कोरोनाचे 32 नवे रुग्ण आढळून आले असून एकूण बाधितांची संख्या 24 हजार 677 वर पोहोचली आहे तर बेळगाव येथील एका 32 वषीय युवकाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या 24 जणांना घरी पाठविण्यात आले आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या 524 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. शनिवारी बेळगाव शहर व उपनगरांतील 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर तालुक्यात एकाचाही अहवालात समावेश नाही.

बेळगाव येथील एका 32 वषीय युवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांचा सरकारी आकडा 334 वर पोहोचला आहे. हिंदवाडी, सदाशिवनगर, सुभाषचंद्रनगर, भाग्यनगर, सह्याद्रीनगर, शहापूर, श्रीनगर, क्लब रोड परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. लक्षणे नसणाऱयांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत.

आतापर्यंत जिह्यातील 23 हजार 820 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 2 लाख 20 हजार 829 जणांची आजवर स्वॅब तपासणी झाली आहे. यापैकी 1 लाख 93 हजार 115 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिह्यातील 27 हजार 122 जण अद्याप 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. प्रशासनाला 1 हजार 702 अहवालांची प्रतिक्षा आहे.

Related Stories

वाळकीत धनाजी पाटील यांचा सत्कार

Patil_p

जीएसटीमुळे करप्रणाली झाली ग्राहकाभिमुख

Amit Kulkarni

उत्तरप्रदेशमधील ‘त्या’ घटनेचा बेळगावात निषेध

Patil_p

रेल्वे सरव्यवस्थापकांनी घेतला आढावा

Patil_p

प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांना राज्यस्तरीय सत्यशोधक 2022 पुरस्कार जाहीर

Rohit Salunke

प्रगतशील लेखक संघ, एल्गार परिषदेतर्फे कार्यक्रम

Omkar B