Tarun Bharat

बेळगाव जिह्यातील 27 जणांना कोरोनाची लागण

Advertisements

शहरातील 18 जणांचा समावेश तर ग्रामीण भागातील 9 जणांचा समावेश

प्रतिनिधी / बेळगा

गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या बळींची संख्या वाढली. त्या पाठोपाठ बाधितांचीही संख्या वाढतच चालली आहे. मंगळवारी जिह्यामध्ये 27 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल देण्यात आला आहे. त्यामध्ये शहरातील 18 जणांचा समावेश आहे. तर ग्रामीण भागातील 9 जणांचा समावेश आहे. शहरातील 18 जणांचा समावेश झाल्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे.

जिल्हाधिकाऱयांनी कोरोना बाधित असलेल्या तालुक्मयांना लॉकडाऊन करण्याचे घोषित केले. त्यानंतर आता शहरामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढल्यामुळे भिती निर्माण झाली आहे. जिह्यामध्ये आतापर्यंत 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अथणी, गोकाक, रायबाग तसेच बेळगाव या तालुक्मयांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत.

जिह्यामध्ये एकूण आतापर्यंत 577 जण कोरोना बाधित झाले आहेत. आतापर्यंत 399 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मंगळवारी एकही कोरोनामुक्त अहवाल आला नाही. मंगळवारी शहराबरोबर अथणी, रायबाग, गोकाक येथे कोरोनाबाधित आढळले आहेत. ग्रामीण भागापेक्षा शहरामध्येच अधिक कोरोनाबाधित मंगळवारी सापडले आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. अशीच अवस्था राहिल्यास पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येणार आहे. तेंव्हा जनतेने काळजी घेणे महत्वाचे आहे. सोशल डिस्टन्स याचबरोबर मास्क आणि सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये जनतेमध्ये गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाधित व्यक्ती संपर्कात आल्यामुळे काही जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवल्यानंतर त्यांचा अहवाल आता पॉझिटिव्ह आढळला आहे. तेंव्हा आता जागृत राहणे गरजेचे आहे.

Related Stories

रॉयल राऊंड टेबल इंडियातर्फे झेंडय़ांचे वाटप

Patil_p

उद्यमबाग रोडवरील डेकोरेटिव्ह लाईट बंद स्थितीत

Omkar B

सुंडी येथे सीआरपीएफ जवान संजय कांबळे यांच्यावर अंत्यसंस्कार

Patil_p

बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातून 34 हजार 869 विद्यार्थी दहावीमध्ये दाखल

Patil_p

धामणे महालक्ष्मी मंदिराच्या गाभारा चौकटीची मिरवणूक

Amit Kulkarni

कडक लॉकडाऊननंतर पुन्हा खरेदीसाठी गर्दी

Amit Kulkarni
error: Content is protected !!