Tarun Bharat

बेळगाव जिह्यात कोरोना बळींची मालिका सुरुच

Advertisements

24 तासांत 5 जण दगावले : अथणी येथील चौघा जणांचा समावेश : निवृत्त एएसआयचाही मृत्यू : बाधितांची संख्याही वाढतीच

प्रतिनिधी /बेळगाव

कोरोना बळींची मालिका सुरुच आहे. गेल्या 24 तासांत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये अथणी येथील चौघा जणांचा समावेश आहे. तर बेळगाव येथील एका सेवानिवृत्त सहाय्यक उपनिरीक्षकाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिह्यातील एकूण बळींची संख्या 31 हून अधिक झाली आहे.

श्वसनाचा त्रास व इतर शारीरिक आजारांवर उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अथणी येथील 62 वर्षीय महिला, 70 वषीय वृध्द, रड्डेरहट्टी (ता. अथणी) येथील 65 वषीय वृध्द व 36 वषीय युवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अथणी तालुक्यात बळींची संख्या वाढती आहे.

तर माळमारुती येथील 68 वषीय सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता 25 ते 40 मधील तरुण व युवकही कोरोनामुळे दगावण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अथणी व बेळगाव तालुक्मयात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा किंवा राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटीनमध्ये त्याचा उल्लेख नसला तरी बिमस्मध्ये गेल्या 24 तासांत या पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान शुक्रवारी बेळगाव शहर व जिह्यातील 71 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये बेळगाव शहरातील 9 व तालुक्यातील 27 असा 36 जणांचा समावेश आहे तर अथणी, चिकोडी, सौंदत्ती, रामदुर्ग आदी तालुक्मयातून पाठविण्यात आलेल्या संशयितांचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ज्या बाधितांना कोरोनाची लक्षणे नाहीत त्यांना हालभावी येथील कोविड-19 केअर सेंटरमध्ये हलविण्यात येत आहे.

Related Stories

जिल्हय़ातील पर्यटनस्थळांवर विकेंड दिवशी पर्यटकांना बंदी

Omkar B

‘वृत्तपत्राचा केक’ वाढदिवसाला अनोखी भेट …!

Amit Kulkarni

अनेक शर्यती गाजविणारा किणयेतील ‘बबल्या’ बैल हरपला

Amit Kulkarni

कर्नाटक : जेडीएस उमेदवार सूरज रेवण्णा हसन मधून विजयी

Abhijeet Khandekar

शिक्षक हा समाजाच्या विकासाचा पाया

Amit Kulkarni

बेंगळूर-बेळगाव स्पेशल रेल्वे प्रवाशांना घेवून दाखल

Patil_p
error: Content is protected !!