Tarun Bharat

बेळगाव जिह्यात गुरुवारी 185 जणांना कोरोनाची बाधा

बेळगाव, चिकोडीतील तिघे जण दगावले

प्रतिनिधी /बेळगाव

कोरोना महामारीचा फैलाव वाढतच चालला आहे. हा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर पाळण्यासंबंधी वारंवार सूचना करुनही नियम बाध्यावर बसवून बाजारपेठेत विनामास्क फिरणाऱयांची संख्या वाढली आहे. गुरुवारी बेळगाव शहर व जिह्यातील 185 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर कोरोनामुळे तिघा जणांचा मृत्यू झाला आहे.

बेळगाव शहर व तालुक्यातील दोघे जण व चिकोडी येथील एकाचा मृत्यू झाला आहे. शहर व उपनगरातील 60 व ग्रामीण भागातील 14 असे बेळगाव तालुक्मयातील 74 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारीही डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱयांचा या अहवालात समावेश आहे. याबरोबरच सुरक्षा दलातील जवानांनाही कोरोनाची लागण सुरुच आहे.

सांबरा एटीएसमधील दोन, आयटीबीपी हालभांवी येथील एक व तोराळी (ता. खानापूर) येथील सीआरपीएफच्या एका जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गुरुवारी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर व कर्मचाऱयांचा पाचहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. बुधवारी बाधित डॉक्टरांची संख्या अधिक होती.

आंबेवाडी, बाळेकुंद्री, गणेशपूर, मच्छे, कुदेमानी, मंडोळी, सांबरा, भाग्यनगर, आनंदनगर, अनगोळ, एपीएमसी रोड, ऑटोनगर, अजमनगर, बसव कॉलनी, बाजार गल्ली-वडगाव, लक्ष्मी टेकडी, महांतेशनगर, नाझरकॅम्प वडगाव, ओंकारनगर, अनगोळ, रामतीर्थनगर, रामदेव गल्ली-बेळगाव, सदाशिवनगर, परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

शहापूर, टिळकवाडी, विश्वेश्वरय्यानगर, विनायकनगर, बिम्स् हॉस्पिटल, गणेशपूर गल्ली-शहापूर, हनुमाननगर, खासबाग, येळ्ळूर परिसरातही गुरुवारी रुग्ण संख्या वाढल्याचे दिसून येते. लक्षणे नसणाऱया बाधितांवर घरीच उपचार करण्यात येत असून लक्षणे असणाऱयांवर सिव्हिल हॉस्पिटलसह वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार सुरु आहेत.

Related Stories

बेळगाव अधिवेशनात उत्तर कर्नाटक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता : मुख्यमंत्री बोम्माई

Abhijeet Khandekar

तीन क्विंटल गांजा नष्ट

Amit Kulkarni

कंग्राळी बुद्रुक परिसरात उत्साहात श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना

Patil_p

कर्करोगाचे वेळीच निदान होणे गरजेचे

Amit Kulkarni

कंग्राळी बुद्रुक ग्रा.पं.ला ‘महिलास्नेही’ पुरस्कार

Omkar B

गांधीगिरी करत बॅरिकेड्स हटविण्यासाठी केले आंदोलन

Patil_p