Tarun Bharat

बेळगाव डिस्ट्रिक्ट बँक असोसिएशनतर्फे कार्यशाळा

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव डिस्ट्रिक्ट अर्बन को-ऑप. बँक असोसिएशन यांच्यावतीने व नाईट फिंटेक यांच्या सहकार्याने टेझरी मॅनेजमेंट सोल्यूशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बँकिंग व्यवहारांमधील मिळविलेले व्याज आणि बँकेच्या अतिरिक्त ठेवींवरील व्याज या दोन्ही बाजू तितक्मयाच महत्त्वाच्या आहेत. म्हणून अतिरिक्त ठेवी कुठे आणि कशा प्रकारे गुंतवाव्यात याला महत्त्व आहे. याबाबत आपण जास्तीत जास्त नफा कसा मिळवू शकतो, याबाबत सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रारंभी अध्यक्ष बाळाप्पा कग्गणगी, उपाध्यक्ष बाळासाहेब काकतकर, सेपेटरी प्रदीप ओऊळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मार्केटिंग इन्व्हेस्टमेंटच्या  बाबतीत पार्थेश शहा व शिवकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला जिल्हय़ामधील सर्व बँकांचे चेअरमन, संचालक, मॅनेजर, इन्व्हेस्टमेंट एक्स्पर्ट मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

16 वी जिल्हास्तरीय स्केटिंग चॅम्पियनशिप उत्साहात

Amit Kulkarni

विमानतळाने गाठला 30 हजार प्रवासी वाहतुकीचा टप्पा

Patil_p

ऑटोरिक्षाचालकांच्या मनमानीची जिल्हाधिकाऱयांकडून गंभीर दखल

Amit Kulkarni

बस्तवाड परिसरातही कचऱयाची समस्या

Omkar B

गुजरातमधील ‘त्या’ आरोपींना फाशी द्या

Amit Kulkarni

मराठी साहित्य संमेलनांवरील निर्बंध घालणे थांबवा

Patil_p