Tarun Bharat

बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघाचे कार्य कौतुकास्पद

वार्ताहर/ उचगाव

बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संस्थेने अल्पावधीत काटकसर, स्वच्छ कारभार आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर कर्तबगार युवकांना, उद्योजकांना, होतकरू गरीब शेतकरीवर्गाला कर्जपुरवठा केला. आर्थिक उलाढाल इतकेच ध्येय न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रात उपक्रम राबविले. सोसायटीच्या संचालक मंडळाने आपली घोडदौड लोकमान्य सोसायटीचे संस्थापक, चेअरमन किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू ठेवल्याने ही सोसायटी सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाला पात्र ठरल्याचे मनोगत तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस मनोज पावशे यांनी व्यक्त केले.

उचगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघ सुळगा (हिं.) या संस्थेच्या दुसऱया शाखेचा शुभारंभ करण्यात आला. शाखा उद्घाटन समारंभात प्रमुख वक्ते म्हणून तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस मनोज पावशे बोलत होते. प्रारंभी गोपाळ पावशे दांपत्याच्या हस्ते सत्यनारायण पूजा पार पडली. नूतन शाखेच्या फीतची गाठ सोडून शिवप्रति÷ानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे व माजी आमदार बी. आय. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे पूजन माजी आमदार बी. आय. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ज्ञानेश्वर प्रतिमेचे पूजन मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका, माजी नगरसेविका नीलिमा पावशे यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन ग्रा. पं. अध्यक्षा योगिता देसाई, किरण पावशे, एस. एम. हंडे, माया कदम, पुंडलिक मोरे, पूजा बेळगावकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्वमंगल सोसायटीचे सीईओ सीताराम नाईक यांच्या हस्ते संगणकाचे उद्घाटन करण्यात आले.

सभारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक पाटील होते. समारंभाला मराठा बँकेचे माजी चेअरमन लक्ष्मण होनगेकर, ता. पं. सदस्या मथुरा तेरसे, कॉन्ट्रक्टर शिवाजी अतिवाडकर, शाखा अध्यक्ष बी. एन. बेनके, ग्रा. पं. सदस्य मनोहर कदम, मिथील जाधव यासह नागरिक उपस्थित होते.

यावेळी संचालक लक्ष्मण खांडेकर, निंगाप्पा देसूरकर, यल्लाप्पा पाटील, कृष्णा पाटील, रुक्मिणी कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. उचगाव शाखेचे बसवंत बेनके, किरण पावशे, एस. एम. हंडे, पुंडलिक मोरे, माया कदम, मुख्य व्यवस्थापक एन. वाय. चौगुले, शाखा व्यवस्थापिका रेखा तुप्पट यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. शाखेत ठेव ठेवलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

उद्घाटनप्रसंगी बोलताना बी. आय. पाटील म्हणाले, समितीचे ऋषितुल्य क्यक्तिमत्त्व किरण ठाकुर यांनी लोकमान्य सोसायटीच्या शाखा सर्व देशभर पसरविल्या आहेत. या लोकमान्य समूहाच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रात सर्वसामान्यांची सेवा बजावत आहेत. समिती व बेळगावचे नाव देशात सर्वत्र पोहोचविले आहे.

किरण गावडे बोलताना म्हणाले की, या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत या भागात विकासाचे जाळे पसरविले आहे. लक्ष्मण होनगेकर म्हणाले की, हे संचालक मंडळ शून्यातून कार्य केलेले असल्याने अनुभव मोठा आहे. म्हणूनच सोसायटी प्रगतिपथावर आहे. नीलिमा पावशे, योगिता देसाई यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

Related Stories

कर्नाटक मंत्र्यांनी शाळा, महाविद्यालये बंद करण्याचे दिले संकेत

Abhijeet Khandekar

परप्रांतीय कामगारांची ‘घरवापसी’

Patil_p

रस्ते विकासाला प्राधान्य देणार

Amit Kulkarni

पदवी अभ्यासक्रमात कन्नडची सक्ती नाही

Amit Kulkarni

पावसाळय़ापूर्वी लेंडी नाल्याची खोदाई पूर्ण करा

Patil_p

नव्वदीचे दशक अन् महिला खो-खोमध्ये यशाचे शिखर

Amit Kulkarni