Tarun Bharat

बेळगाव तालुक्मयातील चार ग्रा.पं.च्या इमारतींचा प्रस्ताव

राजीव गांधी सेवा केंद्रातर्फे बांधण्यात येणार इमारती, मंजुरी मिळताच कामाला सुरुवात

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव तालुक्मयात यापूर्वी अनेक ग्राम पंचायती भाडोत्री तत्त्वावर होत्या. ग्राम पंचायत म्हणजे अडगळीची खोली असल्याचा भास अनेकांना यापूर्वी आला आहे. मात्र कालांतराने सरकारी अनुदान मिळत गेले आणि ग्राम पंचायत इमारतींचा विकास होत गेला. मात्र अजूनही बऱयाच ग्राम पंचायतींच्या इमारती जीर्ण झाल्या असून त्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. बेळगाव तालुक्मयातील चार ग्राम पंचायतींच्या इमारती बांधण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

राजीव गांधी सेवा केंद या योजनेतून तालुक्मयातील चार ग्राम पंचायतींचा विकास साधण्यासाठी प्रयत्न होणार आहे. तालुक्मयातील हंदिगनूर, वंटमुरी, बेकिनकेरे, मोदगा या ग्राम पंचायतींच्या इमारतीचा प्रस्ताव तालुका पंचायतने पाठविला आहे. त्यामुळे लवकरच यांना मंजुरी मिळणार असून विकास कामांना गती देण्यात येणार आहे. अजूनही जिह्यातील काही ग्राम पंचायती भाडोत्री जागेत अथवा इमारतीमध्ये आहेत. त्यांना स्वतःची जागा व इमारत बांधून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.

बेळगाव तालुक्मयात आता एकही ग्राम पंचायत भाडोत्री इमारतीत अथवा जागेत नसली तरी अनेक ग्राम पंचायतींच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाली आहे. याआधी बेळगावात 54 ग्राम पंचायती होत्या. त्यानंतर सरकारने बेळगाव येथे 5 ग्राम पंचायती वाढविल्या आणि त्यांची संख्या आता 59 वर पोहोचली आहे. यामधील निम्म्याहून अधिक ग्राम पंचायतींनी नूतन इमारत बांधल्या आहेत. तर अजूनही बऱयाच ग्राम पंचायतींचा कारभार जुन्या आणि जीर्ण ग्राम पंचायतींमध्ये होत आहे. त्यामुळे याबाबत गांभीर्य घेऊन तालुका पंचायतीच्या माध्यमातून सरकारकडे चार ग्राम पंचायतींच्या इमारती बांधण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

बेळगाव तालुक्मयातील अनेक ग्राम पंचायतींच्या इमारती या राजीव गांधी सेवा केंद्राच्या माध्यमातून बांधण्यात आल्या आहेत. मात्र काही राजकीय नेत्यांनी याचा अप्प्रचार करून आम्हीच ग्राम पंचायतींच्या इमारतींचे काम मंजूर करून आणल्याचे सांगत असल्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे ग्राम पंचायतींच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी राज्य सरकार निधी खर्च करत असतो.

ता.पं.कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी

बेळगाव तालुक्मयातील चार ग्राम पंचायतींचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून याला मंजुरी मिळताच तातडीने कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तेंव्हा संबंधित ग्राम पंचायतींना सूचना देण्यात आल्या आहेत. राजीव गांधी सेवा केंद्रातर्फेच या इमारतींना मंजुरी मिळते. आता मंजुरी मिळताच कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले..

Related Stories

वाहन धडकेत जखमी गाईला वाचवण्यात यश

Amit Kulkarni

युनिव्हर्सल ग्रुपतर्फे पोलिसांसाठी रेनकोट

Amit Kulkarni

सांबरा विमानतळावरील इलेक्ट्रिशियनची आत्महत्या

Patil_p

मद्यांची दुकाने चकाचक ठेवा अन्यथा होणार कारवाई

Patil_p

केवळ 40 जणांनाच विवाहासाठी परवानगी

Amit Kulkarni

बेळगाव शहर आता ‘ग्रीन’ श्रेणीत

Omkar B