Tarun Bharat

बेळगाव-नागपूर विमानसेवा आता 15 एप्रिलपासून

Advertisements

कोरोनामुळे एक महिना उशिराने सुरू होणार विमानसेवा

प्रतिनिधी / बेळगाव

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. त्यामुळे येत्या 16 मार्चपासून सुरू होणारी बेळगाव-नागपूर विमानसेवा 1 महिना उशिरा सुरू होणार आहे. त्यामुळे आता नागपूरला विमान प्रवास करणाऱयांना 15 एप्रिलपर्यंत वाट पहावी लागणार आहे. स्टार एअरने नुकतेच एक पत्रक जाहीर करून याची माहिती कळविली आहे.

स्टार एअरने बेळगाव व महाराष्ट्राच्या उपराजधानीला जोडण्यासाठी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. नुकत्याच सुरू केलेल्या नाशिक व जोधपूर या विमानसेवांना प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळेच कार्गो हब म्हणून उदयाला येणाऱया नागपूर शहराला विमानसेवा सुरू करण्यात येणार होती. पश्चिम महाराष्ट्र, कोकण व उत्तर कर्नाटकातून पहिल्यांदाच या शहराला विमानसेवा सुरू होत असल्याने या विषयी प्रवाशांना उत्सुकता लागली होती.

विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे याचा परिणाम या विमान सेवेवर झाल्याचे दिसून आले.

बुकिंग रिफंड

 महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱया प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. यामुळे स्टार एअरने तूर्तास ही नवीन विमानसेवा रद्द करून 15 एप्रिलपासून विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ज्या प्रवाशांनी विमानाचे बुकिंग केले आहे अशांना त्यांचे बुकिंग रिफंड केले जाईल, असे कंपनीतर्फे कळविण्यात आले आहे.

Related Stories

बैलूर भागात सुगी हंगाम जोरात

Patil_p

कोरोनाबाधितांना आता मुंग्यायुक्त अंडी!

Patil_p

शुक्रवारीही पावसाची रिपरिप सुरूच

Patil_p

जायंट्स सखीच्या मदतीचे पर्व पुन्हा सुरू

Patil_p

सीगन इलेव्हन, लक्ष क्रिकेट क्लब संघ विजयी

Amit Kulkarni

शेतकऱयांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

Patil_p
error: Content is protected !!