Tarun Bharat

बेळगाव-नागपूर विमानसेवा लवकरच

स्टार एअरचे व्यवस्थापकीय संचालक श्रेणिक घोडावत यांची माहिती

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव विमानतळ हे स्टार एअरसाठीचे एक हब आहे. त्यामुळे आतापर्यंत स्टार एअरने येऊन अनेक शहरांना विमानसेवा सुरू केली आहे. जानेवारीमध्ये नाशिक, फेब्रवारीमध्ये जोधपूर तर लवकरच नागपूर शहराला विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. आणखी एक विमान स्टार एअरच्या ताफ्यात जमा होणार असून त्यानंतर ही विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती स्टार एअरचे व्यवस्थापकीय संचालक श्रेणिक घोडावत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लहान शहरांना विमानसेवेद्वारे जोडणे हे स्टार ग्रुपचे अध्यक्ष संजय घोडावत यांचे स्वप्न आहे. त्यात बेळगाव, हुबळी, सुरत, अहमदाबाद, जोधपूर, नाशिक या शहरांचा समावेश आहे. नागपूर हे विमानतळ आता देशातील एक मोठे कार्गो विमानतळ म्हणून उदयाला येऊ लागले आहे. त्यामुळे बेळगाव-नागपूर विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्टारला कार्गोची परवानगी

स्टार एअरला आता परदेशात प्रवास करण्याची परवानगीही मिळाली आहे. त्यामुळे बेळगावच्या प्रवाशांनी प्रतिसाद दिल्यास इतर देशांमध्येही सेवा सुरू केली जाईल. कार्गो वाहतुकीची परवानगी स्टार एअरला मिळाल्याने भविष्यात कार्गो वाहतूकही केली जाऊ शकते. बेळगाव व हुबळी या दोन शहरांमधून कार्गे वाहतुकीची क्षमता असल्याने ती सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

लॉकडाऊननंतर स्टार एअरने धाडस करीत अनेक नव्या मार्गांवर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगाव-नाशिक विमानसेवा सोमवारपासून सुरू झाली असून या मार्गावर प्रवास करणाऱया प्रवाशांची सोय होणार आहे. यामुळे बेळगाव व नाशिक येथील औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास स्टार एअरचे सीईओ सिमरनसिंग तिवाना यांनी व्यक्त केला. 

Related Stories

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातर्फे दोन रुग्णवाहिका

Omkar B

सुस्थितीत असलेल्या रस्त्याची खोदाई

Amit Kulkarni

जलवाहिनी घालण्याच्या कामामुळे बसवेश्वर चौकात वाहतूक कोंडी

Amit Kulkarni

गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सला नॅक मूल्यांकनात ‘ए’ नामांकन

Amit Kulkarni

शहापूर परिसरात संपूर्ण लॉकडाऊन

Patil_p

दसरा महोत्सव पारंपरिकपणे करण्यास परवानगी द्या

Amit Kulkarni