Tarun Bharat

बेळगाव नावाबाबत महाराष्ट्र सरकारला पत्र

Advertisements

केंद्राकडे महाराष्ट्र सरकारने पाठपुरावा करावा

बेळगाव : बेळगावचे नामांतर बेळगावी कर्नाटक सरकारने केले. त्याला महाराष्ट्र सरकारने विरोध केला नाही. मात्र आता केरळ राज्याने कर्नाटक राज्याच्या सीमेला लागून असलेल्या कन्नड भाषिक गावाचे नामकरण करण्याचा अध्यादेश काढला आहे. त्याला कर्नाटक सरकारने सर्व ताकदीनिशी विरोध केला आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने याबाबतीत काहीच केले नाही. तेव्हा आता महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला सर्व ताकदीनिशी जाब विचारावा, अशी मागणी म. ए. समितीचे कार्यकर्ते सूरज कणबरकर यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर आम्हा सीमावासियांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. हुतात्म्यांचा घोर अपमान केला आहे. कारण केंद्रात भाजप सरकार आल्यानंतरच बेळगावचे बेळगावी असे नामकरण झाले आहे. आता महाराष्ट्र सरकारने सर्व ताकदीनिशी याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून बेळगावीचे बेळगाव करावे, अशी मागणी केली आहे.

Related Stories

हायव्होल्टेजमुळे समर्थनगरमध्ये लाखो रुपयांचे नुकसान

Patil_p

साईराज वॉरियर्स, विश्रुत स्ट्रायकर्स संघ विजयी

Amit Kulkarni

गणेबैल हायस्कूलला नूतन ग्रा. पं. सदस्यांकडून थर्मल स्क्रिनिंग भेट

Patil_p

कर्ले ज्योती हायस्कूलच्या 2 खेळाडूंची जिल्हा स्पर्धेसाठी निवड

Amit Kulkarni

‘काश्मीर फाईल्स’ सुवर्ण मयुराच्या शर्यतीत

Amit Kulkarni

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या युवकाचा भोसकून खून

Patil_p
error: Content is protected !!