Tarun Bharat

बेळगाव पोस्ट खात्याने एका दिवसात उघडली 10 हजार बँक खाती

प्रतिनिधी/ बेळगाव

इंडिया पोस्ट बँकेची खाती घरोघरी उघडली जावीत यासाठी पोस्ट विभागाने मंगळवारी ‘महालॉगईन डे’चे आयोजन केले होते. संपूर्ण राज्यभर करण्यात आलेल्या या उपक्रमात बेळगाव विभागानेही सहभाग घेतला होता. शहर तसेच ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांची बँक खाती उघडण्यात आली. एका दिवसात तब्बल 10 हजार बँक खाती उघडून बेळगाव विभाग राज्यात अव्वल ठरला आहे.

ज्या ग्राहकांचे अद्याप बँक खाते नाही अशा नागरिकांचे इंडिया पोस्टपेमेंट बँकेत खाते उघडण्यात येत आहे. केवळ आधारकार्ड व मोबाईलच्या साहाय्याने अवघ्या पाच मिनिटात खाते उघडण्यात येत होते. संपूर्णपणे कॅशलेस खाते असल्याने ग्राहकांना मोबाईलवरून ते हाताळता येत आहे. बेळगाव शहर तसेच ग्रामीण भागात घरोघरी जाऊन पोस्ट कर्मचाऱयांनी बँक खाते उघडले आहे.

राज्यभरात एकूण 1 लाख नवीन खाती सुरू करण्याचे उद्दिष्ट पोस्ट विभागाने ठेवले होते. यामध्ये बेळगाव विभाग सर्वात अक्वल ठरला आहे. ग्रामीण भागात पोस्टमन व इतर कर्मचाऱयांनी घरोघरी जाऊन खाती सुरू केली. शहरातही गर्दीच्या ठिकाणी जाऊन नवीन खाती उघडण्यात आली आहेत. 

Related Stories

दहावी पुरवणी परीक्षा 27 जूनपासून

Amit Kulkarni

अमित शहांचा कर्नाटक निवडणूक प्रचार स्थगित; मणिपूरमधील हिंसाचारावर लक्ष ठेवण्यासाठी दिल्लीला रवाना

Abhijeet Khandekar

शिंदोळीत युवकाचा खून

Amit Kulkarni

कम्युनिटी हेल्थ कर्मचाऱयांचे आंदोलन

Amit Kulkarni

रस्ता झाला; आता भुयारी मार्गाचे काय?

Amit Kulkarni

जिल्हय़ात आतापर्यंत 5.39 टक्के खरीप पेरणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!