Tarun Bharat

बेळगाव-बेंगळूर सकाळची विमानफेरी पूर्ववत

स्पाईस जेटने सुरू केली विमानफेरी, प्रवाशांमधून समाधान

प्रतिनिधी /बेळगाव

तांत्रिक कारणाने मागील काही महिन्यांपासून बंद असलेली बेळगाव-बेंगळूर ही सकाळची विमानफेरी सोमवारपासून पूर्ववत सुरू झाली. स्पाईस जेट कंपनीने ही विमानफेरी सुरू केल्याने सकाळच्या सत्रात प्रवास करणाऱयांना सोयीचे झाले आहे. त्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळच्यावेळी बेंगळूर येथून बरेच अधिकारी, राजकारणी, उद्योजक विमानाने बेळगावमध्ये दाखल होतात. दिवसभर काम करून संध्याकाळी पुन्हा बेंगळूरला परततात. सकाळची विमानफेरी बंद असल्याने त्यांना एक दिवस आधी बेळगावमध्ये दाखल व्हावे लागत होते. यामध्ये वेळ वाया जात असल्याने सकाळच्या सत्रात विमानफेरी सुरू करावी, अशी मागणी होत होती. तसेच बेळगावमधून बेंगळूरला जाणाऱया प्रवाशांनाही सोयीचे ठरत असल्याने या फेरीची मागणी होत होती. अखेर सोमवारपासून या विमानफेरीला सुरुवात झाली.

आणखी एका फेरीची पडली भर

कोरोनापूर्वी बेळगावमधून चार कंपन्या बेंगळूर शहरासाठी सेवा देत होत्या. परंतु सध्या केवळ इंडिगो ही कंपनी बेळगाव-बेंगळूर सेवा देत होती. स्पाईस जेटने आपली सेवा पूर्ववत केल्याने आता आणखी एका फेरीची भर पडली आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला आहे.

अशी आहे विमानफेरी

बेंगळूर येथून सकाळी 6.10 वा. निघालेले विमान 7.35 वा. बेळगाव विमानतळावर पोहोचणार आहे. सकाळी 8 वा. बेळगाव विमानतळावरून निघालेले विमान 9.25 वा. बेंगळूरला पोहोचणार आहे. ही सेवा दररोज असल्याने प्रवाशांना आता काही तासांमध्ये बेंगळूरला पोहोचता येणार आहे.

Related Stories

हिंडाल्कोजवळ बस चालकाला मारहाण

Patil_p

सिग्नेचर, रॉजर स्पोर्ट्स, विलास बेंद्रे संघ विजयी

Amit Kulkarni

ट्रान्स्फॉर्मरखाली कचरा टाकणे धोक्याचेच

Amit Kulkarni

जिल्हय़ात सक्रिय रुग्णसंख्या 3 हजारांवर

Omkar B

कॅन्टोन्मेंट पथदीपांबाबत अधिकारी धारेवर

Amit Kulkarni

पी. के. क्वॉर्टर्सच्या इमारती वापराविना धूळखात

Amit Kulkarni