Tarun Bharat

बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक निकालः भाजपच्या मंगला अंगडी विजयी

बेंगळूर / प्रतिनिधी

देशात २ लोकसभा आणि १४ विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकांचा निकाल लागला आहे. दरम्यान कर्नाटकमध्ये एक लोकसभा आणि दोन विधानसभेच्या जागांसाठी मतमोजणी पार पडली. कर्नाटकातील लोकसभेच्या एका तर विधानसभेच्या दोन जागांचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामध्ये विधानसभेच्या दोन जागांचे निकाल हाती आले आहेत. एक जागा भाजपने तर एक जागा काँग्रेसने जिंकली आहे. तर लोकसभेची जागा भाजपने जिंकली आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक निकालात शेवटपर्यंत काटे की टक्कर पहायला मिळाली.

शेवटच्या क्षणापर्यंत चढाओढ सुरु असताना अखेर भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांनी बाजी मारली आहे. काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांचा भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांनी पराभूत केलं आहे. परंतु ही लढत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारामुळे अधिक रंगतदार झाली. दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शुभम शेळके यांनी निवडणूक लढवली. संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटकचे या लढतीकडे लक्ष लागून होते.

दरम्यान काँग्रेचे उमेदवार सतीश जारकिहोळी यांना ४३२८८२ मते पडली आहेत. तसेच भाजपच्या मंगला अंगडी यांना ४३६८६८ मते मिळाली आहेत. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना ११६९२३ मते पडली आहेत. इथे काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत झालेली पाहायला मिळाली. सुरवातीपासून मंगला अंगडी आघाडीवर होत्या नंतर काँग्रेसचे सतीश जारकिहोळी यांनी आघाडी घेतली. नंतर शेवटी मंगला अंगडी यांनी आघाडी घेत विजय संपादन केला.

Related Stories

बेरोजगारीमुळे 2019 मध्ये राज्यात 553 जणांची आत्महत्या

Amit Kulkarni

सोमवारी उडुपीमध्ये शाळा, पीयू महाविद्यालये बंदच राहणार

Archana Banage

ऑगस्टच्या प्रारंभी शाळा-महाविद्यालये सुरू?

Patil_p

कर्नाटक: एचआयव्ही रूग्णांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत औषधे : आरोग्यमंत्री

Archana Banage

बेंगळूर हिंसाचारात एसडीपीआयचा सहभाग : मंत्री आर. अशोक

Archana Banage

रेमडेसिवीरचा काळाबाजार केल्याप्रकरणी आतापर्यंत १०४ जणांना केली अटक

Archana Banage