Tarun Bharat

बेळगाव-वेंगुर्ले रोडवरील हॉटेलमध्ये 45 हजाराची चोरी

वार्ताहर/ हिंडलगा

लॉकडाऊन असतानाही हिंडलगा येथील एका हॉटेलमध्ये चोरीची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून सुमारे 45 हजार रुपयांचे साहित्य चोरटय़ांनी लांबविले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावरील वनखात्याच्या नाक्मयासमोर असलेले आरुष नामक शाकाहारी-मांसाहारी हॉटेल लॉकडाऊनमुळे बंदच होते. त्यामुळे मालक हणमंत पाटील व नागेंद्र पाटील कुलूप लावून गावी गेले होते. याचाच फायदा घेऊन चोरटय़ांनी बाजूला असलेल्या झाडाच्या साहाय्याने हॉटेलमध्ये प्रवेश करून सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक, सिलिंडर, दोन पोती तांदूळ, चार किलो काजू, पाण्याच्या बाटल्या आदी सुमारे 45 हजार रुपयांचे साहित्य लांबविले आहे.

सोमवारी सकाळी हणमंत पाटील यांनी हॉटेल उघडल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. बीट पोलीस मल्लिकार्जुन गाडवी यांनी हॉटेलची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला.  आजूबाजूला वस्ती नसल्याने चोरटय़ांचे फावले असून सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Stories

गर्लगुंजी रस्ताकामाकडे दुर्लक्ष

Omkar B

केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल सुरू करण्याची परवानगी

Patil_p

बस धावल्या पण मोजक्याच

Patil_p

बबन, भक्ती, मनिकांत, प्राजक्ता, मोनूकुमार, स्नेहा विजेते

Amit Kulkarni

गुंडेवाडीत कोरोना बळीमुळे दहशत

Patil_p

केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावीत

Patil_p