Tarun Bharat

बेळगाव शहरात कोरोनाचा पहिला बळी

24 तासांत दोघांचा बळी : जिल्हय़ातील मृतांची संख्या 4 वर : सकाळी मृत्यू तर तासाभरात अहवाल पॉझिटिव्ह

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव शहरात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. गुडस्शेड रोड-शास्त्राrनगर येथील 72 वषीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ माजली असून या वृद्धाच्या संपर्कातील 18 जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या चारवर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने सारी प्रकरण अशी त्याची नोंद केली आहे. एका अथणी तालुक्मयात दोन दिवसांत दोघा जणांचा मृत्यू झाला आहे.

गुडस्शेड रोड-शास्त्राrनगर येथील 72 वषीय वृद्ध 2 ते 17 जूनपर्यंत बेंगळूरला गेला होता. बेंगळूरहून परतल्यानंतर हा वृद्ध घरीच होता. गेल्या आठवडय़ात 21 जून रोजी ताप आल्याने खासगी इस्पितळात उपचार घेण्यात आले. थोडा ताप कमी झाला. 26 जून रोजी पुन्हा त्रास जाणवल्याने या वृद्धाला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यानंतर 28 जून रोजी शहापूर येथील आणखी एका खासगी इस्पितळात हलविण्यात आले. श्वसनाचा त्रास तीव्र झाल्याने मंगळवारी 30 जून रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारीच त्या वृद्धाचे स्वॅब जमविण्यात आले होते. बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला.

मृत्यूनंतर केवळ एक ते दीड तासात स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आरोग्य विभागातील अधिकाऱयांना खडबडून जाग आली. दुपारी तातडीने वृद्धाच्या घरी अधिकारी व कर्मचाऱयांनी धाव घेतली. वृद्धाच्या थेट संपर्कातील 9 जण व खासगी इस्पितळात उपचार करणारे 9 कर्मचारी अशा एकूण 18 जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

यासंबंधी तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजीव डुमगोळ यांच्याशी संपर्क साधला असता कोरोनामुळे वृद्धाचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. तर राज्य आरोग्य विभागाने बुधवारी सायंकाळी जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्येही त्याचा उल्लेख केला आहे. रुग्ण क्रमांक 15272 या 72 वषीय वृद्धाचा सारीने मृत्यू झाल्याचा उल्लेख आहे.

दरम्यान, मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शिवनूर (ता. अथणी) येथील एका रहिवाशाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 45 वषीय इसमाला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला आणताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोना बळींची संख्या 4 वर पोहोचली आहे. एका अथणी तालुक्मयात दोन तर बेळगाव शहर व तालुक्मयात दोघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

इस्पितळ कर्मचाऱयांना क्वारंटाईन

या वृद्धावर खासगी इस्पितळात उपचार करणाऱया 9 कर्मचाऱयांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. 28 जून रोजी त्याला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी 30 जूनला त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. दोन दिवस उपचार करणाऱया 9 कर्मचाऱयांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. ज्या वॉर्डमध्ये वृद्धावर उपचार करण्यात आले होते तो वॉर्ड बंद करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी सांगितले.

कोरोनाचा बळी तरीही शिकवणी सुरूच

सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज बंद आहेत. खासगी शिकवण्याही बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर शास्त्राrनगर परिसरातील काही घरांमध्ये विद्यार्थ्यांच्या शिकवणी घेण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. हा प्रकार धोकादायक ठरणार आहे.

Related Stories

नवी गल्ली, शहापूर येथे शिवजयंती

Patil_p

ई-केवायसीमुळे रेशनकार्ड दुरुस्तीला वेग

Omkar B

आता रिंगरोडविरोधात जनआक्रोश आंदोलन

Amit Kulkarni

न्यायालयात दाद मागणार

Amit Kulkarni

कार-बस अपघातात चौघेजण ठार, एक गंभीर

Amit Kulkarni

मांगूर येथील गर्भवतीस कोरोनाची लागण

Patil_p