Tarun Bharat

बेळगाव शहरासह तालुक्यात हुडहुडी

बेळगावचा पारा 8.6 अंशांवर : धुक्मयाची लाट सकाळपर्यंत, कडाक्याच्या थंडीने आरोग्याच्या समस्येत वाढ, ग्रामीण भागात शेकोटय़ा पेटू लागल्या

प्रतिनिधी /बेळगाव

पावसाच्या विक्रमी नोंदीनंतर आता थंडीचीही विक्रमी नोंदीकडे वाटचाल चालल्याचे दिसत आहे. बुधवारी पारा तब्बल 8.6 अंशांवर घसरला होता. त्यामुळे साऱयांनाच हुडहुडी भरली होती. या थंडीबरोबरच धुकेही पडत असल्याने मॉर्निंगवॉकर्सची संख्या घटली असल्याचे चित्र दिसून आले. सकाळी 11 वाजले तरी अंगातील थंडी कमी होत नक्हती. त्यामुळे सूर्यकिरणांचा सहारा घेण्याचा प्रयत्न होताना दिसत होता.

मागील काही दिवसांपासून थंडीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसभरही थंडी जाणवू लागली आहे. यावषी पाऱयाने निचांकी आकडय़ाची नोंद केली आहे. या थंडीमध्ये दुचाकी चालविणे तर कसरतीचे होत होते. स्वेटर तसेच इतर उबदार कपडय़ांचा आधार घेऊन अनेक जण कामावर जाताना दिसत होते. स्वेटर तसेच उबदार कपडे घातले तरी थंडी आवरत नव्हती. त्यामुळे एरवी सावलीचा आधार घेणारे उन्हामध्ये उभे राहून थंडी घालविण्याचा प्रयत्न करत होते.

या थंडीमुळे ग्रामीण भागात तर शेकोटय़ा पेटू लागल्या आहेत. नदी-नाल्यांच्या काठावर तर कडाक्मयाची थंडी पडली होती. त्यामुळे शेतकऱयांना या थंडीचा मोठा फटका बसला आहे. ऊसतोडणी कामगारांचा तर या थंडीमुळे जीव कासावीस झाला आहे. सारा संसारच उघडय़ावर असतो. त्यातच ही थंडीची लाट आल्याने ऊसतोडणीवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

उबदार कपडय़ांच्या दुकानांमध्ये गर्दी

कोरोनासारख्या महाभयंकर आजाराला तोंड देताना यावषी वरुणराजालाही तोंड द्यावे लागले. थंडी वाढल्यामुळे थंडीलाही तोंड द्यावे लागत आहे. संक्रांत जवळ आली आहे. संक्रांतीनंतर थंडी कमी होईल, अशी आशा व्यक्त होत आहे. मात्र, सध्या कडाक्मयाची थंडी पडल्याने साऱयांनाच हुडहुडी भरली आहे. या थंडीमुळे उबदार कपडे विक्री करणाऱयांचा व्यवसाय मात्र तेजीत आला आहे. कोरोनामुळे तसेच थंडी गायब झाल्यामुळे उबदार कपडे घेण्याकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, आता कडाक्मयाची थंडी पडत असल्यामुळे प्रथम उबदार कपडे घेतलेले बरे म्हणून बुधवारी उबदार कपडय़ांच्या दुकानांमध्ये गर्दी दिसून आली.

थंडीबरोबरच बुधवारी पहाटे धुकेही मोठय़ा प्रमाणात पडले होते. झाडांवरून पावसासारखे थेंब पडत होते. या धुक्मयामधून वाहने चालविणे कठीण जात होते. त्यामुळे अनेकांनी वाहने रस्त्याच्या बाजूला घेऊन थांबलेलेच बरे म्हणून सकाळ होईतोवर विश्रांती घेतली. मात्र, सकाळी 8 वाजेपर्यंत धुक्मयाची लाट अनेक ठिकाणी होती.

दरवषी ऑक्टोबरअखेरपासून थंडीला सुरुवात होते. मात्र यावषी नोव्हेंबर महिन्यातदेखील पाऊस पडल्याने थंडी गायब झाली हाती. आता थंडीला सुरुवात झाली असून बुधवारी बेळगावचे किमान तापमान 8.6 अंशांवर घसरले असून कमाल तापमान 26 अंशांवर घसरले होते. बेळगाव शहर व तालुका परिसरात बदलणाऱया वातावरणामुळे आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होताना दिसत आहे.

हवामानातील बदलांबद्दल वेगवेगळय़ा चर्चा

थंडीच्या दिवसांत पाऊस पडल्यामुळे थंडी गायब झाली होती. मात्र, आता थंडीत मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. ऑक्टोबर गरमीचे तापमान ओसरल्यानंतर एकदम गारवा निर्माण होतो. मात्र, यावषी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्येदेखील दमदार पाऊस कोसळला होता. आता त्यानंतर थंडीला जोरदार सुरुवात झाल्याने हवामानातील बदलांबद्दल वेगवेगळय़ा चर्चा रंगताना दिसत आहेत. 

Related Stories

कलाश्री ग्रुप योजनेतून ग्राहकांना बक्षीस जाहीर

Amit Kulkarni

मनपा कार्यालयाच्या नियमित कामकाजास प्रारंभ

Patil_p

आत्महत्या करणाऱ्या कंत्राटदाराला कधीच भेटलो नाही-मंत्री ईश्वरप्पा

Archana Banage

एपीएमसीतील आंदोलनकर्त्यांचे उपोषण मागे

Patil_p

औद्यौगिक वसाहत निर्माणचे काम बंद पाडणार!

Patil_p

मण्णूर रस्ता डांबरीकरण काम अंतिम टप्प्यात

Amit Kulkarni