Tarun Bharat

बेळगाव शहर शिक्षकांसाठी विविध स्पर्धा

Advertisements

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना व संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव शहर शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन दि. 18 व दि. 19 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.

 अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात टिळकवाडी माध्यमिक शारीरिक शिक्षक संघटनेची बैठक झाली. या बैठकीत बेळगाव शहर शिक्षकांसाठी विविध स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

संत मीरा प्रशालेची 40 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विविध स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला, प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, क्रीडाशिक्षक विवेक पाटील, प्रवीण पाटील, जयसिंग धनाजी, उमेश बेळगुंदकर, सोमशेखर हुद्दार, अर्जुन भेकने, चंद्रकांत पाटील, बीजी सोलोमन यांच्या हस्ते दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

त्यानंतर मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार यांनी बेळगाव शहरातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी सांघिक पुरुष गटात व्हॉलीबॉल व महिलांसाठी थ्रोबॉल व वैयक्तिक स्पर्धा, 40 वर्षाखालील ,40 वर्षावरील, व मुख्याध्यापक गट अशा  तीन गटात 60 मी धावणे, गोळा फेक, संगीत खुर्ची, स्लो सायकलिंग रिले, लिंबू चमचा, दोरीवरच्या उडय़ा अशा स्पर्धा घेण्यात येणार आहेत, असे नमूद केले.

इच्छुक शालेय शिक्षक संघानी आपली नावे 10 डिसेंबर पूर्वी स्पर्धा सचिव सी. आर. पाटील संत मीरा शाळा अनगोळ, विवेक पाटील ठळकवाडी शाळा टिळकवाडी, यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Stories

जिवंत वृद्धेला मृत दाखवून रेशन कार्ड केले रद्द

Amit Kulkarni

प्रत्येक चित्रांमध्ये जाणवतोय जिवंतपणा!

Patil_p

डीवायएसएस बेळगाव, बैलूर संघ बेळवडी मल्लम्मा चषकाचे मानकरी

Amit Kulkarni

केएलई फिजिओथेरपी क्रिडा स्पर्धा उत्साहात

Patil_p

चिकोडी मतदारसंघातील रस्ते विकासासाठी 120 कोटी

Patil_p

बांगरपेट तालुक्यातील तहसीलदारांचा निवृत्त मुख्याध्यापकाकडून खून

Abhijeet Shinde
error: Content is protected !!