Tarun Bharat

बेळगाव-शेडबाळ पॅसेंजर 12 ऑक्टोबरपर्यंत रद्द

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव-शेडबाळ-बेळगाव ही पॅसेंजर दि. 12 ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. बेळगाव रेल्वेस्थानकातील यार्डच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. महिन्याभरात दुसऱयांदा पॅसेंजर रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. ऐन नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पॅसेंजर रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत.

बेळगाव ते शेडबाळ या मार्गावर सध्या एकच पॅसेंजर धावत आहे. परंतु ही पॅसेंजर वरचेवर रद्द करण्यात येत आहे. अवघ्या महिन्याभराच्या कालावधीत दुसऱयांदा पॅसेंजर रद्द झाली आहे. यामुळे प्रवाशांना एक्स्प्रेस रेल्वेने प्रवास करावा लागत आहे. गणेशोत्सवातही पॅसेंजर रद्द करण्यात आली होती. आता ऐन नवरात्रोत्सवातही पॅसेंजर रद्द करण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Related Stories

फोन ईन कार्यक्रमात परराज्यातूनही तक्रारी

Amit Kulkarni

डॉ. आंबेडकर यांचा अवमान करणाऱयांवर कारवाई करा

Amit Kulkarni

अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स अंतिम फेरीत

Amit Kulkarni

कार्तिक स्वामींची आकर्षक आरास

Patil_p

लोकमान्य सोसायटीकडून ग्राहकांसाठी खूशखबर

Patil_p

मध्यप्रदेशातील कामगारांना कित्तूरमधून परत धाडले

Amit Kulkarni