Tarun Bharat

‘बेळगाव श्री’ शरीरसौष्टव स्पर्धेला प्रारंभ

Advertisements

मराठा युवक संघाचे आयोजन; शंभरहून अधिक स्पर्धकांचा सहभाग

क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव

मराठा युवक संघ व बेळगाव जिल्हा शरीरसौष्टव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव श्री जिल्हास्तरीय शरीरसौष्टव स्पर्धेला मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेत 100 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे.

ही स्पर्धा मराठा मंदिर रेल्वे ओव्हरब्रिज, खानापूर रोड येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा आयबीबीएफ मुंबई यांच्या नियमानुसार विविध सात वजनी गटात घेण्यात येत आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली येथील कर्नाटक सरकारचे विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील, पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार, पुरस्कर्ते संजय सुंठकर, शिवाजी हंगीरगेकर, सिद्धार्थ हुंदरे, दिगंबर पवार, प्रदीप अष्टेकर, संजय मोरे, शिवाजी हंडे, सुधीर दरेकर, सदानंद शिंदोळकर, धनंजय पटेल, मोहन बेळगुंदकर, रणजित मन्नोळकर, संजय चव्हाण, सदानंद शिंदोळकर, महादेव चौगुले, बाळासाहेब काकतकर, चंद्रकांत गुंडकल, दिनकर घोरपडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रारंभी बाळासाहेब काकतकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे शंकरगौडा पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार यांनी हनुमान मूर्तीचे पूजन केल्यानंतर शंकरगौडा पाटील यांनी श्रीफळ वाढवून 55 व्या बेळगाव श्री स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी शंकरगौडा म्हणाले, मराठा युवक संघाने गेली 55 वर्षे न डगमगता ही स्पर्धा सातत्याने चालू ठेवली आहे, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. सध्याच्या काळात कोणतीही संस्था 50 वर्षे कार्य करीत नाही. पण एकजुटीने ही संस्था उभी राहून शरीरसौष्टव व जलतरण स्पर्धा भरवितात, याचे कौतुक वाटते, असे सांगत त्यांनी संघटनेला शुभेच्छा दिल्या. 55 किलो, 60, 65, 70, 75, 80 व 80 किलोवरील गटात ही स्पर्धा घेण्यात आली. यावेळी या स्पर्धेचे पंच अजित सिद्दण्णावर, मि. इंडिया सुनील आपटेकर, एम. के. गुरव, एम. गंगाधर, वासुदेव साखळकर, नूर मुल्ला, अनिल आमरोळे, अनंत लंगरकांडे, सुनील पवार, राजू नलवडे, सुनील अष्टेकर, हेमंत हावळ व स्टेज मार्शल सुनील राऊत यांनी काम पाहिले. मराठा युवक संघाचे रघुनाथ बांडगी, मारूती देवगेकर, दिनकर घोरपडे, अजित सिद्दण्णावर, गंगाधर एम., नेताजी जाधव, किरण पाटील, शिवाजी हंगीरगेकर, लक्ष्मण होनगेकर, संजय मोरे, रमेश पावले, विजय बोंगाळे, सुनील भोसले, सुहास किल्लेकर, नारायण किटवाडकर, पांडुरंग जाधव, बंडू मजुकर, दिगंबर पवार, शेखर हंडे, प्रभाकर कडोलकर, श्रीकांत देसाई, मोहन सप्रे व विश्वास पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

शहरासह ग्रामीण भागाला वळिवाने झोडपले

Patil_p

ग्रहणानिमित्त शहरातील विविध मंदिरांत धार्मिक कार्यक्रम

Patil_p

तुरमुरी रामलिंग हायस्कूलमध्ये मलेरिया, डेंग्यूविषयक मार्गदर्शन

Patil_p

मालवाहू ट्रकचे नियंत्रण सुटल्याने अपघात ; चालकाचा वेदनादायी मृत्यू

Rohit Salunke

कर्नाटक: कोरोनाचे ५० टक्केहून अधिक रुग्ण बरे

Archana Banage

सीआयडी अरण्य पथक, परिश्रम अथक!

Omkar B
error: Content is protected !!