Tarun Bharat

बेळगाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडपासाठी परवानगी

बेळगाव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच दिवस गणेशोत्सव साजरा करण्याची सूचना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाने बजावला होता. पाच दिवस की अकरा दिवसा हा सण साजरा करायचा, याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने मंडप घालण्याची परवानगी उपलब्ध झाली नव्हती. पण संबंधित परिसराच्या पोलीस स्थानकात मंडप परवानगी देण्यासाठी अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बेळगावचा गणेशोत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. प्रतिवषी अकरा दिवस गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. प्रारंभी मंदिरांमध्ये गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी, तसेच पाच दिवस हा सण साजरा करण्याची सूचना शासनाकडून करण्यात आली होती. पण काही ठिकाणी मंदिरे नसल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मूर्तीची प्रतिष्ठापना कुठे करायची? असा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यामुळे रस्त्यांवर मंडप घालण्यासाठी परवानगी देण्यात यावी, तसेच अकरा दिवस गणेशोत्सव साजरा करण्यावर गणेशोत्सव मंडळे ठाम होती. त्यामुळे याबाबत गोंधळ निर्माण झाला होता.

अशातच महापालिका निवडणुकीमुळे मंडप परवानगी देण्यासाठी महापालिका प्रशासनाने कोणती सुविधा उपलब्ध केली नव्हती. मात्र अखेरच्या क्षणी मंडप परवानगी देण्याकरिता संबंधित पोलीस स्थानकात काऊंटर सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस स्थानकमहापालिका कर्मचाऱयांचे नावमनपा वरिष्ठ अधिकारी
टिळकवाडीमहादेव गुंजीगावी  (9956692090)गोपाल व्ही सुख्ते (7975282560)
मार्केटमहांतेश नाईक  (9886669962)पी. बी. मेत्री ( 9482543710)
खडेबाजाररणजीत कोवाडकर  (9036858200)गजानन बेणगे ( 9902407544)
उद्यमबागमहावीर साखे  (9481942748)रमेश कोणी (9742709007)
कॅम्पअमित गंथडे  (9886056388)रंगस्वामी के. एस. (8618725894)
माळमारुतीआण्णाप्पा नाईक  (9740256290)मंजुनाथ गडाद  ( 8150085178)
शहापूरसंतोष कांबळे  (9740340171)रवि मास्तीहोळी मठ (7760555850)
एपीएमसीनागेश कलपत्री (9481913117)किरण मण्णिकेरी (9449731560)

Related Stories

गणेशोत्सवासाठी प्रवाशांच्या संख्येत वाढ

Amit Kulkarni

महामोर्चा-काळय़ादिनी सायकल फेरी होणारच

Amit Kulkarni

कंग्राळी येथील कार्यकर्त्यांचा निषेध मोर्चात सहभाग

Amit Kulkarni

करुणा, श्रेया, शिवानी वाघेला भगिनींचा सत्कार

Amit Kulkarni

शनिवारी 631 जण कोरोनामुक्त, 274 नवे रुग्ण चौघा जणांचा मृत्यू

Patil_p

मच्छेतील डुकरांचा त्वरित बंदोबस्त करा

Amit Kulkarni