Tarun Bharat

बेळगाव-सौंदत्ती मार्गावर प्रवाशांसाठी जादा बसेस

यल्लम्मा रेणुकादेवीच्या दर्शनासाठी 40 अतिरिक्त बसेस

प्रतिनिधी /बेळगाव

सौंदत्ती येथील यल्लम्मा रेणुकादेवी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे नवरात्रोत्सव काळात दर्शनासाठी भाविकांची वर्दळ वाढली आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंडळाकडून बेळगाव-सौंदत्ती मार्गावर यल्लम्मा यात्रेसाठी जादा बसेस सोडल्या जात आहेत.

परिवहन मंडळाने प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून जादा 40 बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून गुरुवारपासून ही अतिरिक्त बससेवा बेळगाव-सौंदत्ती मार्गावर धावत आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नवरात्रोत्सव व सुटीच्या दिवसांत जादा बस सोडण्याचा निर्णय परिवहनने यापूर्वी घेतला आहे. त्याबरोबरच सौंदत्ती येथील रेणुकादेवीच्या दर्शनासाठी जाणाऱया भाविकांच्या सोयीखातर विनाथांबा बससेवा सुरू केली आहे. प्रवाशांच्या संख्येनुसार बस पुरविल्या जाणार आहेत. नवरात्रोत्सव काळात प्रवाशांची संख्या वाढल्यास बसफेऱया पुन्हा वाढविल्या जाणार आहेत.

मागील आठवडय़ापासून सौंदत्ती रेणुकादेवी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे बेळगावसह खानापूर, चंदगड, गडहिंग्लज, हुक्केरी, चिकोडी तालुक्मयातील भाविकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी बेळगाव-सौंदत्ती मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. मध्यवर्ती बसस्थानकात सकाळी 6 पासून रात्री 10 वाजेपर्यंत बेळगाव-सौंदत्ती मार्गावर बसेस धावत आहेत. दरम्यान गर्दी टाळण्यासाठी परिवहनने ऑनलाईन तिकिट बुकिंगची व्यवस्था केली आहे. प्रवासी ksrtc.karnataka. gov.in या वेबसाईटवर तिकिट बुकिंग सुरू आहे.

Related Stories

मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा

Omkar B

शहर-ग्रामीण भागासाठी स्वतंत्र मीटर विक्री केंद्र सुरू करा

Omkar B

पाच कोटीचे अंबरग्रीस जप्त : दोघांना अटक

Omkar B

वनवासमाचीच्या 11 जणांसह 12 जणांना डिस्चार्ज

Patil_p

भक्तिभावाने अंगारकी संकष्टी साजरी

Amit Kulkarni

आजपासून रात्री 9 पर्यंत सर्व व्यवहार सुरू राहणार

Amit Kulkarni