Tarun Bharat

बेळगाव स्पोर्ट्स क्लब, आनंद अकादमी उपांत्य फेरीत

युनियन जिमखाना मैदानावरील सन्निधी टी-10 क्रिकेट स्पर्धा : शिवप्रकाश, वेंकटेश, आनंद कुंभार सामनावीर पुरस्काराचे मानकरी

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

युनियन जिमखाना मैदानावर नीना स्पोर्ट्स क्लब आयोजित सन्निधी टी -10 क्रिकेट स्पर्धेत आज खेळविण्यात आलेल्या सामन्यातून आनंद क्रिकेट अकादमी संघाने बेळगाव लायन संघाचा तर बेळगाव स्पोर्ट्स संघाने इंडियन बॉईज संघाचा पराभव करून प्रत्येकी 3 गुण मिळविले. वेंकटेश शिराळकर, आनंद कुंभार, शिवप्रकाश हिरेमठ यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

युनियन जिमखाना मैदानावर पहिल्या सामन्यात बेळगाव लॉयन संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 5 बाद 69 धावा केल्या. गणेश जांभळेने 2 षटकार 2 चौकारासह नाबाद 27 तर प्रणव सोमण्णावरने 2 षटकारासह 18 धावा केल्या. आनंद क्रिकेट अकादमीतर्फे आनंद कुंभारने 4 धावात 4 तर हर्ष पॅट्रॉटने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल आनंद क्रिकेट अकादमी संघाने 7.1 षटकात 2 बाद 70 धावांसह एकतर्फी विजय नोंदवला. शिवप्रकाश हिरेमठने 1 षटकार 3 चौकारासह 26, नागेंद्र पाटीलने 4 चौकारासह 25 धावा केल्या. बेळगाव लायन्सतर्फे करण यळगुकर, इस्माईल सय्यद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

दुसऱया सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने 10 षटकात 3 बाद 151 धावा केल्या. त्यात वेंकटेश शिराळकरने 5 षटकार 1 चौकारासह 12 चेंडूत 42, पार्थ पाटीलने 3 षटकार 3 चौकारासह 36 तर विजय पाटीलने 4 षटकारासह नाबाद 34 धावा केल्या. इंडियन बॉईजतर्फे अकबर काझी, तारीख पटवेकर, शरिफ देसाई यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल इंडियन बॉईज संघाने 10 षटकात 6 बाद केवळ 58 धावाच केल्या. त्यात शोहब मन्नूरवालेने 1 षटकार 2 चौकारासह 21, निहाल पटेलने 17 धावा केल्या. बीएससी तर्फे अमर घाळीने 2 गडी बाद केले,

तिसऱया सामन्यात आनंद क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 3 बाद 101 धावा केल्या. शिवप्रकाश हिरेमठने 2 षटकार 6 चौकारासह नाबाद 56 तर साहिल पारिश्वाडने नाबाद 21 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंडियन बॉईजने 10 षटकात 7 गडी बाद 53 धावाच केल्या. शोहेब मन्नूरवालेने 12 धावा केल्या. आनंदतर्फे तुषार चौगुलेने 7 धावात 3 तर राहुल वाजंत्रीने 2 गडी बाद केले.

बुधवारी पहिला उपांत्य सामना के. आर. शेट्टी वि. आनंद अकादमी सकाळी 11 वाजता तर बेळगाव स्पोर्ट्स क्लब वि. युनियन जिमखाना यांच्यात 1 वाजता दुसरा उपांत्य सामना होईल. अंतिम सामना दुपारी 3 वाजता खेळविला जाणार आहे.

Related Stories

लम्पिस्कीन जनावरांवर योग्य उपचार करा

Amit Kulkarni

नुकसानग्रस्तांची कागदपत्रे कृषी अधिकाऱयांकडे सुपूर्द

Amit Kulkarni

अतिक्रमणावर सॅटेलाईट प्रणालीची नजर

Amit Kulkarni

कोरोना थोपविण्यासाठी कारागृहातील कैद्यांचाही हातभार

tarunbharat

जि. पं. सर्वसाधारण सभेत अधिकाऱयांविरोधात गंभीर आरोप

Patil_p

ओंकारनगरमध्ये सांडपाण्यामुळे रहिवासी हैराण

Amit Kulkarni