Tarun Bharat

बेळगुंदी येथील एकाचा अज्ञाताकडून भीषण खून

Advertisements

गळय़ावर तीक्ष्ण हत्याराने वार, कारण गुलदस्त्यात : घरात एकटाच असताना खून झाल्याने खळबळ

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगुंदी ता. बेळगाव येथील एका रहिवाशाचा भीषण खून झाला आहे. रविवारी सकाळी खुनाचा हा प्रकार उघडकीस आला असून गळय़ावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

गजानन बाळाराम नाईक (वय 52) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. शनिवारी रात्री 9 ते रविवारी सकाळी 11.30 यावेळेत हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती समजताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, बेळगाव ग्रामीणचे एसीपी गणपती गुडाजी, पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर आदी अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

हा खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा झाला नाही. खून झालेल्या गजाननचा भाऊ सुरेश नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

उपलब्ध माहितीनुसार गजानन हा मूळचा बसुर्तेचा. गेल्या पंधरा वर्षांपासून बेळगुंदी येथे त्याचे वास्तव्य आहे. पत्नी वेगळी राहते. घरी गजानन व मुलगा हे दोघेच रहात होते. शनिवारी रात्री मुलगा बसुर्ते येथील आपल्या चुलत्याकडे गेला. त्यामुळे गजानन घरात एकटाच होता. त्यावेळी खून झाला आहे.

रविवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास मुलगा घरी परतला. त्यावेळी गजाननचा मृतदेह रक्ताच्या थारोळय़ात पडला होता. गजानन यापूर्वी बेकरी चालवत होता. सध्या रिअल इस्टेटचा व्यवसाय करीत होता. त्याचा खून कोणी व कशासाठी केला? याचा तपास करण्यात येत आहे.

Related Stories

मुंबई-बेंगळूर महामार्गावर 100 चार्जिंग स्टेशन्स

Amit Kulkarni

तालुक्यात गणहोम, पूजा-महाप्रसादांचे आयोजन

Amit Kulkarni

कर्नाटक सरकारने फेस्टिवल अडव्हान्स मध्ये केली २५,००० रुपयांपर्यंत वाढ

Sumit Tambekar

मनपा शोधणार अपात्र बीपीएल कार्डधारक

Amit Kulkarni

सोमवारी दिवसभर संततधार

Amit Kulkarni

आजपासून विद्यार्थ्यांचा प्रवास तिकीटवर

Amit Kulkarni
error: Content is protected !!