Tarun Bharat

`बैतुलमाल’चा पुरग्रस्त ३ गावांना मदतरुपी आधार

प्रतिनिधी / कोल्हापूर

पंधरा दिवसांपूर्वी येऊन गेलेल्या महापूरामुळे आंबेवाडी, चिखलीसह जिह्यातील जयसिंगपूर, कुंभोज, हुपरी, शिरोळ, कुरुंदवाड येथील कुटुंबीयांचे अतोनात नुकसान झाले. प्रशासनाने या पुटुंबाना सुरक्षितस्थळी नेले असले तरी त्यांना अंगावरच्या कपडÎावर काही दिवस काढावे लागले. अशा परिस्थितीत जोपर्यंत पुरबाधित कुटुंबे स्थिरस्थावर होत नाही, तोपर्यंत त्यांना आधार देण्यासाठी जिल्हा बैतुलमाल कमिटीने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी कमिटीने जयसिंगपूर, इंगळी व शिरोळमधील पुरग्रस्त कुटुंबांसाठी 3 टेम्पो जीवनावश्यक वस्तुंचे किट जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या उपस्थितीत पाठवले. 

इब्राहीम खाटीक चौकात माणसाला माणूस जोडणारा हा कार्यक्रम झाला. रवाना केलेल्या टेम्पोतील जीवनावश्यक वस्तूंचे किट सातशे ते आठशे कुटुंबीयांना दिले जाणार आहे. एक मोठा आधार देणाऱया प्रत्येक किटमध्ये 25 किलो तांदुळ, 10 किलो गहू पीठ, कांदा-बटाटा व साखर प्रत्येकी 3 किलो, तेल, मुग, मसुर, तुरडाळ प्रत्येकी 2 किलो, कडधान्ये प्रत्येकी 1 किलो, प्रत्येकी अर्धा किलो चटणी व चहापूड यासह मीट, साबण, चटई, कपडे, साडी व चादर आदी समावेश आहे.

कर्नाटकातील बैतुलमाल कमिटींकडून पुरग्रस्तांसाठी मदत मिळाली आहे. जिह्यातील शेकडो मुस्लिम बांधवांनीही पैसे व धान्य स्वरुपात मदत दिली आहे. कमिटीकडे जमलेल्या पैशातून धान्य, कपडे, चटई व चादरींची खरेदी केली. बैतुलमालच्या कार्यकर्त्यांनीही पुरबाधित गावांची माहिती घेण्यापासून ते अगदी त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्यासाठी खुप परिश्रम घेतले आहेत. या परिश्रमामुळेच पाच हजार पुरग्रस्त कुटुंबीयांपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोचवणे शक्य होणार असल्याचे जाफरबाबा सय्यद यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, बैतुलमाल कमिटीने मदत कार्यातून माणुसकीचा सेतू बांधला आहे. हा मदतकार्याचा सेतू भविष्यातही अधिक भक्कम रहावा, यासाठी लवकरच जिल्हाप्रशासनाची बैतुलमाल कमिटीसोबत विशेष बैठक बोलवली जाईल. यावेळी माजी महापौर हसिना फरास, कळंबा कारागृहाचे अधीक्षक चंद्रमुनी इंदुलकर, करवीरचे प्रांत वैभव नावडकर, शाहूवाडीचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, सैफुल्ला मलबारी, राजू नदाफ, अश्पाक शेख, ईर्शाद थोडगे, याकुब चौधरी, अर्षद सय्यद व फजलेकरीम पठाण आदी उपस्थित होते.

Related Stories

झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाबरोबर विद्यापीठाचा सामंजस्य करार

Abhijeet Khandekar

पावनखिंड येथे मद्यधुंद तरुणांची स्थानिकांकडून धुलाई

Archana Banage

कोल्हापूर- सांगली जिल्ह्यात नोकरदारांना ये-जा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी परवानगी द्यावी

Archana Banage

राज्यातील सहाही विधानपरिषद जागा भाजप जिंकणार

Abhijeet Khandekar

महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट, कर वसुली वाढवा; आयुक्त डॉ. बलकवडे यांच्या सूचना

Archana Banage

बनावट जमिन वाटप आदेशप्रकरणी बैठक घ्या

Archana Banage