Tarun Bharat

बैलगाडी शर्यतीतल्या सहभागी स्पर्धकांवर होणार कारवाई

चिपळूण

न्यायालयाकडून बंदी असतानाही त्यातच कोरोनामुळे लागू केलेले नियम व अटी पायदळी तुडवत बिनधास्तपणे चिंचघरी या ठिकाणी घेण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीत सहभागी झालेले स्पर्धक अर्थात बैलगाडी मालकांवरही आता पोलीस कारवाई करणार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात असून यामुळे बैलगाडी मालक धास्तावले आहेत.

या प्रकरणी प्रदीप कदम, नितेश शिर्के, महम्मद खान, आश्रफ कडवेकर, अनंत जाधव, कदम, मधुकर सावर्डेकर, ऋतिक दाते या 8 स्पर्धा आयोजकांवर चिपळूण पोलिसांनी यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे. तसे पाहिल्यास बैलगाडी शर्यत हा खेळ ग्रामीण भागात रुजला असला तरी स्पर्धेदरम्यान बैलाचा केला जाणारा छळ यामुळे या स्पर्धेला प्राणीप्रेमीसह अनेक संस्थांनी केलेल्या बंदीच्या मागणीनुसार न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवर बंदी आणली आहे. असे असताना व त्यातच जिह्यात कोरोनामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असतानाही हे सर्व नियम पायदळी तुडवून बिनधास्तपणे तालुक्यातील चिंचघरी-अडरे गावाच्या सीमेलगत असणाऱया मोकळय़ा मैदानावर गुरुवारी बैलगाडी शर्यत घेतली गेली. या स्पर्धेचे फोटो तसेच व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी वरील आठजणांविरोधात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे आयोजकांनंतर आता शर्यती स्पर्धेत सहभागी झालेल्या बैलगाडी मालकावरही पोलीस कारवाई करणार असून त्या दृष्टीने त्यांनी शोध सुरु केला आहे. त्यासाठी पोलीस व्हिडिओ तसेच फोटाचा आधार घेत आहेत.

 या स्पर्धेत एकूण किती बैलगाडय़ा सहभागी झाल्या होत्या, हे पुढे आले नसले तरी स्पर्धेचे व्हीडीओ व फोटो शोधमोहिमेअंती याचा उलघडा होणार आहे. पोलिसांनी शनिवारी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. बैलगाडी मालकांची शोध मोहीम सुरु केली आहे. तसे पाहिल्यास वरील 8 आयोजक हे एकाच ठिकाणाचे नसून ते आसपासच्या गावांतील आहेत. ते एकत्र येऊन ही स्पर्धा कसे काय घेऊ शकतात तसेच केवळ आठच आयोजक नसून आणखी काहीचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तुरळ येथे अपघात

Archana Banage

कुख्यात गुंड सचिन जुमनाळकर अद्यापही फरार

Archana Banage

‘तौक्ते’चा रत्नागिरी किनारपट्टीला तडाखा

Patil_p

बंदी असूनही पर्यटक आंबोलीत

NIKHIL_N

सरकारचा कोकणवासीयांना दिलासा

Patil_p

चिपळूण : धावत्या शिवशाही बसचे चाक अचानक निखळले, प्रवासी सुखरुप

Abhijeet Khandekar