Tarun Bharat

बैलूर येथे नवरात्रोत्सवाची उत्साहात सांगता

वार्ताहर / बैलूर

पुरातन परंपरा लाभलेल्या विविध देव-देवतांच्या मंदिरांमध्ये गुरुवारपासून घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला जल्लोषी वातावरणामध्ये प्रारंभ करण्यात आला होता. येथील जागृत देवता श्री पावणाई, मंगाई, सातेरी, चाळोबा, नागेशी, कलनाथ, मार्कंडेय नदीच्या उगमस्थानावरील सिद्धनाथ आदी मंदिरांमध्ये विधिवत पूजा करून विजयादशमी, दसऱयापर्यंत अखंड हरिपाठ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisements

बैलूर येथील गुरव गल्लीमध्ये चाळोबा मंदिरासमोर व मजरेवाडय़ावर विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर दुर्गामातेची प्रति÷ापना करण्यात आली होती. नऊ दिवस दुर्गामातेसमोर विविध कार्यक्रम आखून गारबा दांडिया युवावर्ग व बालगोपाळ खेळत होते. प्रत्येक दिवशी गावातील नवदाम्पत्यांच्या हस्ते देवीची ओटी भरून पूजा करण्यात येत होती.

बुधवार दि. 13 रोजी अष्टमीदिवशी आरती कार्यक्रम पार पडला. यावेळी  भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. नवसाला पावणाऱया श्री पावणाई देवीची भक्तांकडून ओटी व तळी भरण्यात आली. विजयादशमीला दुपारी पालखी सोहळा पार पडला. यावेळी श्री पावणाई मंदिराभोवती परंपरेप्रमाणे झांजपथकाच्या निनादात प्रदक्षिणा घालण्यात आल्या. प्रदक्षिणा घालतेवेळी मंदिराच्या दगडी भिंतीवर नारळ मारून तसेच अनेक महिलांनी आपल्या तान्हुल्यांना पालखीखाली झोपवून नवस फेडले. यानंतर पालखी शमी वृक्षाकडे नेऊन विधिवत पूजा करून सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला. रात्री दुर्गामातेची सवाद्य मिरवणूक काढून विसर्जनाने दसरोत्सवाची सांगता करण्यात आली.

बैलूर येथे दुर्गामाता दौडची सुरुवात

पुरातन परंपरा लाभलेल्या बैलूर गावामध्ये दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात येत नव्हते. मात्र, यावषीपासून युवावर्गाच्या सहकार्यातून दौडची सुरुवात करण्यात आली. यावेळी बैलूरसह बाकनूर, बेळवट्टी व मोरब या गावांमध्ये दौड काढण्यात आली. दौडच्या पहिल्याच वषी हजारो धारकऱयांनी उपस्थिती दर्शवून सहकार्य केले.

भाविकांची दर्शनासाठी गर्दी

बैलूर येथील पावणाई, मंगाई, सातेरी माऊली मंदिरे जागृत असून वर्षभरामध्ये आठवडय़ातील दोन दिवस कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आदी भागातून दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली असते. मात्र, गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोना विषाणूच्या धास्तीमुळे दर्शनासाठी निर्बंध घातले होते. आता निर्बंधांचे शिथिलीकरण केल्याने पुन्हा भाविकांची गर्दी होत आहे. नवरात्रोत्सव काळामध्ये भाविकांकडून देवीची ओटी भरणे, नवस फेडणे, गाऱहाणे आदी कामे चालू असतात. यासाठी तिन्ही राज्यांतून भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Related Stories

उसनवारीवर चालला 40 टक्के कुटुंबांचा गाडा

Patil_p

बिटकॉइन घोटाळ्यात काँग्रेसचे नेते सामील: सीएम बोम्माई

Sumit Tambekar

पंतप्रधान मोदींनी लावला आढावा बैठकांचा सपाटा

Patil_p

दिल्लीमध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या 14 हजार पार

Omkar B

ईपीएफओचा पेन्शनधारकांना मोठा दिलासा

Rohan_P

देहरादून : जनशताब्दी ट्रेनच्या धडकेने हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!