Tarun Bharat

बॉक्सर सरिता देवी कोरोनामुक्त

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताची माजी विश्वविजेती महिला बॉक्सर एल. सरिता देवी कोरोनामुक्त झाली आहे. मात्र ती आता इंफाळमध्ये स्वत: आयसोलेशनमध्ये आहे. दरम्यान तिला एक मुलगा असून खबरदारीचे उपाय म्हणून तिने आपल्या स्वत:च्या घरी न जाता दुसऱया ठिकाणी किमान दहा दिवसांसाठी राहण्याचा निर्णय घेतला आहे.

38 वर्षीय एल. सरिता देवी आणि तिचा पती थोयबा सिंग यांना 17 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे या दोघांवर एका रूग्णालयात वैद्यकीय उपचार चालू होते. सरिता देवीची पुन्हा एकदा कोरोना चांचणी घेण्यात आली आणि या चांचणीत ती निगेटिव्ह असल्याने तिला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या आठवडय़ात थोयबा सिंगला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. सरिता देवीची स्वत:ची अकादमी असून या अकादमीमध्ये असलेल्या वसतीगृहामध्ये तिचे 10 दिवस वास्तव्य राहणार आहे. थोयबा सिंगच्या आयसोलेशनचा कालावधी येत्या दोन दिवसांत संपणार आहे.

सरिता देवीने आपल्या वैयक्तिक मुष्टीयुद्ध कारकीर्दीत पाचवेळा आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक मिळविले आहे. कोरोनाची बाधा झालेली सरिता देवी ही भारताची दुसरी मुष्टीयोद्धी आहे. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारा भारताचा मुष्टीयोद्धा डिंको सिंगला कोरोनाची बाधा झाली होती. मात्र महिनाभराच्या कालावधीत डिंको सिंग कोरोना व्याधीतून पूर्ण बरा झाला असून आता तो कर्करोगाशी संघर्ष करीत आहे.

Related Stories

मिश्र सांघिक स्कीटमध्ये भारताला सुवर्ण

Patil_p

मेदव्हेदेव, किरगॉईस, गॉफ, गार्सिया चौथ्या फेरीत

Patil_p

बांगलादेशचा पहिला डाव 233 धावात समाप्त

Patil_p

आयसीसी कसोटी मानांकनात कोहली-विल्यम्सन संयुक्त दुसऱया स्थानी

Patil_p

बांगलादेश क्रिकेट दौऱयासाठी अष्टपैलू हाफीजला विश्रांती

Patil_p

‘स्लो स्टार्टर्स’ मुंबई आज केकेआरविरुद्ध लढणार

Patil_p