Tarun Bharat

बॉक्साईट रोडवर गांजा विकणाऱया जोडगोळीला अटक

प्रतिनिधी /बेळगाव

बॉक्साईट रोडवरील भारतनगर परिसरात गांजा विकणाऱया दोघा जणांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याजवळून 1 किलो 400 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

मार्केटचे एसीपी एस. आर. कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. के. मिटगार, एन. वाय. मैलाकी, एस. जी. कुगटोळ्ळी, व्ही. पी. बुधनावर, एस. एस. हलगीमनी, केंपण्णा दोडमनी, नामदेव लमाणी आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे.

नितीन सुरेश मकवानी (वय 37) रा. बॉक्साईट रोड-आंबेडकरनगर, बेळगाव, नईम अब्बास खोजा (वय 28) मूळचा राहणार टिपू सुलताननगर, गोकाक, सध्या राहणार आसदखान सोसायटी अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याजवळून 28 हजार रुपये किमतीचा 1 किलो 400
ग्रॅम गांजा, 800 रु. रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

Related Stories

सायंकाळी 6 पर्यंत करता येणार मतदान

Amit Kulkarni

दादबानहट्टीजवळ 300 किलो बेकायदा चांदी जप्त

Patil_p

बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गाचा पिंकबुकमध्ये समावेश

Amit Kulkarni

कर्जावरील व्याजदरात कपात करण्याची मागणी

Amit Kulkarni

शहरात उन्हाचा तडाखा

Patil_p

पेटीबंद उमेदवारांचे आज ठरणार भवितव्य

Patil_p