Tarun Bharat

बॉक्सिंग डे कसोटीला प्रेक्षक उपस्थितीसाठी ऑस्ट्रेलियाचे प्रयत्न

सिडनी

 येत्या नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार असून या दौऱयात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. सध्या कोरोनामुळे प्रेक्षकविना सामने खेळविले जात आहेत. दरम्यान, मेलबर्न येथे होणाऱया बॉक्सिंग डे कसोटीला प्रेक्षकांच्या उपस्थितीसाठी परवानगी मिळविण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रयत्न चालू आहेत.

ऑस्ट्रेलिया शासनाकडून क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि टेनिस ऑस्ट्रेलिया यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप व्हिक्टोरिया स्ट्रेटचे प्रमुख डॅनियल ऍड्रय़ूसश यांनी केला आहे.

ऑस्ट्रेलियात कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर गेल्या जुलैपासून व्हिक्टोरिया स्टेट पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला आहे. व्हिक्टोरियामध्ये आतापर्यंत 26,000 लोक बाधित असून किमान 800 बळी पडले आहेत.

 गेल्यावर्षी मेलबोर्न पार्क येथे जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेला किमान आठ लाख शौकिनांनी आपली उपस्थिती दर्शविली. तसेच गेल्यावर्षी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला सुमारे दोन लाख शौकिनांनी हजेरी लावली होती. यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे ची कसोटी मेलबर्नऐवजी ऍडलेड येथे भरविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Related Stories

राधानगरीची पै,आलीशाची अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Abhijeet Khandekar

भारत-द.आफ्रिका महिलांच्या तिरंगी मालिकेची अंतिम लढत आज

Patil_p

बोपण्णा, सानिया यांचे आव्हान समाप्त

Patil_p

दियागो मॉरिसियो गोल्डन बूटचा मानकरी

Patil_p

पाकिस्तानची सेमीफायनलच्या दिशेने आगेकूच

Patil_p

स्पेन-स्वीडन रोमांचक लढत अखेर बरोबरीत

Patil_p